अमरावती : चिखलदरा पर्यटन महोत्सव शनिवारी सुरू झाला असून आजपर्यंत म्हणजेच 16 जुलैपर्यंत राहणार आहे. या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे शनिवारी सकाळी उद्घाटन झाले आहे. थंड हवेच्या ठिकाणासह पावसाळी पर्यटन स्थळ ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून चिखलदऱ्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. परंतु महोत्सवाचे ढिसाळ नियोजन, बेशिस्त वाहतुकीमुळे पहिल्या दिवशीच बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मान्सून डेस्टिनेशन : चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन चिखलदरा पर्यटन महोत्सवासह ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव’ यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे तसेच येथील दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येथे उत्साहाने येतात. पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य, हिरवळ, जागोजागी असलेले धबधबे, ढगाळ कुंद वातावरण, सकाळी तसेच सायंकाळी धुक्याचे सर्वत्र आच्छादन यामुळे चिखलदरा ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून विकसित व्हावे, यासाठी पर्यटन संचालनायामार्फत येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र बेशिस्त वाहतूक आणि ढिसाळ नियोजनाचा फटका मात्र वन्य प्राण्यांना बसत आहे. महोत्सावाच्या पहिल्या भरधाव कारच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला.
कार्यक्रमाची प्रचार नाही : आदिवासींच्या विकासासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. येथे उत्पादित होणारे मध, स्ट्रॉबेरी, बांबूच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव निश्चितच मदतनीस ठरणार असल्याच्या भावना उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच जगभरात चिखलदराच्या ख्याती व्हावी आणि पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी हा महोत्सव आयोजित केला. पण पर्यटन विभागाने कुठलेही नियोजन आणि कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी केलेली नाही. दरम्यान चिखलदरा येथे जाण्यासाठी परतवाड्यावरुन एकेरी रस्ता आहे. त्यामुळे धामणगाव गढी नाक्यावर वेग प्रतिबंधित फलक ठिकठिकाणी लावणे आवश्यक होते. वेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचबरोबर परतवाडा ते चिखलदरा मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचे झोन आहेत. रात्रीच्या वेळी हे वन्य प्राणी रस्तावरुन जात असतात. त्यामुळे ते अपघातातचे शिकार होत असतात.
हेही वाचा -