अमरावती - तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावात कुऱ्हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आज (शनिवारी) थाटात उद्घाटन झाले. तसेच पुढील दोन दिवस येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
गेल्या ९ वर्षांपासून येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय यांच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात गावातील सर्व शासकीय आणि निमशासकीय शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असतात. या महोत्सवाच्या माध्यमातून गावातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शेतकरी मेळावा, महिलांसाठी विविध कार्यक्रम, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीर यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच उद्घाटनावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्घाटनापूर्वी गावातून भारतीय संविधानाची ग्रंथ दिंडी देखील काढण्यात आली.