ETV Bharat / state

Power lifter Kripa Patil : महाराष्ट्राची सर्वात कमी वयाची पावरलिफ्टर कृपा पाटील, पाचवीत असताना करते स्पर्धेची जोरदार तयारी

मला मावशी सारखेच बॉडी बिल्डर व्हायचे आहे. तिच्या सारखीच बॉडी बनवायची आहे, असा अट्टाहास १० वर्षाच्या लहानग्या कृपाने आपल्या आई वडिलांकडे धरला. कोरोनाच्या काळात पुण्याला गेलेली कृपा परत आली ती पावरलिफ्टर होण्याचा निश्चय करूनच. येथूनच तिच्या पॉवरलिफ्टरच्या प्रवासाला सुरुवात झाली.आज ती महाराष्ट्राची सर्वात कमी वयाची पावरलिफ्टर बनली आहे.

Power lifter Krupa patil
महाराष्ट्राची कमी वयाची पावरलिफ्टर
author img

By

Published : Jan 19, 2023, 9:59 AM IST

महाराष्ट्राची सर्वात कमी वयाची पावरलिफ्टर कृपा पाटील

अमरावती : विजया कॉन्व्हेन्ट शाळेत पाचवीत शिकते. कृपाने एके दिवशी आपल्या शाळेतील जिममध्ये चक्क ५५ किलो वजन अगदी अलगदपणे उचलले. त्यामुळे प्राचार्या पद्मश्री देशमुख यांना धक्काच बसला. त्यांनी तिच्यातला स्पार्क ओळखला आणि त्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. लगोलग ही गोष्ट कृपाच्या वडिलांना फोनवरून ही गोष्ट कळवली. एकीकडे ती घरापासूनच जवळ असलेल्या आखाडा जिममध्ये भारोत्तोलनाचा सराव करीत होती तर दुसरीकडे पुण्यातील पॉवरलिफ्टर क्षेत्रात कामकरत असलेल्या मंडळीच्या संपर्कात सुद्धा होती. पुण्यातल्या बॉडी बिल्डर मावशीचेही तिला मार्गदर्शन सुरूच होते.

पावर लिफ्टिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग : अशातच छत्तीसगड येथील रायपूर येथे पावर लिफ्टिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा असलल्याचे तिला समजले. तिने मनाचा ठाम निश्चय करून या स्पर्धेत उतरण्याची ठरवले. मग काय पुन्हा जोमाने सराव सुरू झाला.अगदी सुरुवातीला 30 किलो वजन उचलण्यापासूनचा सुरू झालेला सराव येऊन थांबला तो ९७ किलो वजनावर. तिच्या खानपणावर आम्ही कुटुंबीय विशेष लक्ष देत होते. तिला जेवणामध्ये काय द्यायला हवे आणि काय नको याविषयी आम्ही चौकस असतो. तिला संतुलित आहार देण्याकडे आमचा कल असतो असे तिच्या आईने सांगितले.

सर्वात कमी वयाची पावरलिफ्टर : इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कृपाचे आज वय दहा वर्षाचे आहे. तिचे वजन 43 किलो आहे. परंतु तिने आपल्या वजनाच्या दुप्पट वजन उचलून महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची पावर लिफ्टर होण्याचा मान मिळवला आहे. 5 ते 8 जानेवारीदरम्यान छत्तीसगड येथील रायघर येथे पार पडलेल्या पावर लिफ्टर स्पर्धेत कृपाने गोल्ड मेडल मिळविले आहे. तिचे वय इतर खेळाडुच्या तुलनेत सर्वात कमी होते. अशा स्थितीत तीने 97.5 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नॅशनल पावर लिफ्टिंगसाठी इंटरनॅशनल कोच दगडू गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली ती खेळायला गेली होती. त्यामुळे महाराष्ट्राकडून खेळत असलेली कृपा गणेश पाटील आता प्रशिक्षक स्वराज व मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनॅशनल खेळण्यासाठी तयारी करत आहे. सर्वात कमी वयाच्या पावर लिफ्टर स्पर्धेत कृपा पाटील ही अव्वल ठरली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंटरनॅशनलच्या तयारीत कृपा : कृपा गणेश पाटील ही जुना सातुर्णा परिसरातील श्रद्धा श्री अपार्टमेंटमध्ये राहत असून, ती विजया स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिला स्पर्धेसाठी शाळेकडून सुध्दा सहकार्य मिळाले आहे. तीने 10 वर्षावरील वयोगटात नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला होता. छत्तीसगड येथील रायगड येथे नुकत्याच पार पडलेल्या पावर लिफ्टर स्पर्धेत कृपा पाटीलने गोल्ड मेडल मिळविले आहे. तिचे वय इतर खेळाडुच्या तुलनेत सर्वात कमी होते. त्यामुळे महाराष्ट्राकडून खेळत असलेली कृपा गणेश पाटील आता प्रशिक्षक स्वराज व मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनॅशनल खेळण्यासाठी तयारी करत आहे. विजयी होऊन अमरावतीत येताच तिचे जंगी स्वागत करण्यात आले. तिने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्या पद्मश्री देशमुख, आखाडा जिमचे स्वराज, सपोर्टर मानकर, श्रेयस माटे , आई वडील आणि मावशी यांना दिले आहे.

हेही वाचा : Talegaon Dashasar Shankarpat तळेगाव दशासर यात्रेत महिलांची राज्यातील एकमेव बैलगाडा शर्यत नऊ वर्षांनंतर तरुणींचा लक्षणीय सहभाग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.