ETV Bharat / state

जाणून घ्या विदर्भाची कुलदैवत अन् अमरावतीची ग्रामदैवत आंबादेवी मंदिराविषयी! - amravati ambadevi temple news

अमरावती शहराचे नाव अंबामातेच्या नावावरूनच पडले असे मानले जाते. 1499 मध्ये यवनांनी वऱ्हाडवर कब्जा केला. त्यावेळी अनेक मंदिरांपैकी अंबादेवीचे सुवर्ण मंदिरही त्यांनी लुटले. अंबादेवीच्या गाभाऱ्यात मात्र ते पोहचू शकले नाही, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. आंबदेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या पाषाणात आहे.

अमरावतीची ग्रामदैवत आंबादेवी
अमरावतीची ग्रामदैवत आंबादेवी
author img

By

Published : Oct 17, 2020, 1:29 PM IST

Updated : Oct 17, 2020, 2:10 PM IST

अमरावती - विदर्भाची कुलदैवत आणि अमरावतीची ग्रामदैवत असणारी अंबादेवी सुमारे 5 हजार वर्षांपासून अमरावतीत आहे. पूर्वी गावाबाहेर असणारे आणि आज शहराच्या मध्यभागी असलेले अंबामातेचे अतिप्राचिन मंदिर आहे. अंबामातेच्या मंदिराशेजारीच एकवीरादेवीचेही मंदिर आहे. अमरावती शहराचे नाव अंबामातेच्या नावावरूनच पडले, असे मानले जाते.

अमरावतीमधील अंबामातेचे अतिप्राचिन मंदिर

नवसाला पावणारी अमरावतीची आंबादेवी ही ऐतिहासिक पुरव्याद्वारे 1097च्या पूर्वीपासून स्वयंभू मूर्ती स्वरुपात स्थानापन्न असावी आणि त्या काळात अंबादेवीचे भव्य सुवर्ण मंदिर असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. अंबामातेची मूर्ती बेसॉल्ट दगडाची आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अंबादेवीची मूर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात स्थानापन्न होती. पूर्वेकडे दरवाजा असलेले हे मंदिर अतिशय लहान होते. मंदिराच्या चोहीकडे दगडाच्या भिंती होत्या. मंदिराचा गाभारा पण लहान होता. आंबदेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या पाषाणात असून ही पूर्णाकृती मूर्ती आसनस्थ आहे. दोन्ही हात मांडीवर विसावलेले, डोळे अरधोनमिलीत, शांत, गंभीर, ध्यानस्थ मुद्रा धारण केलेल्या मूर्तीचे हात व पाय अतिशय बारीक आहेत.

अंबादेवी सुवर्ण मंदिर लुटले यवनांनी

यवनांनी 1499मध्ये वऱ्हाडवर कब्जा केला. त्यावेळी अनेक मंदिरांपैकी अंबादेवीचा सुवर्ण मंदिरही त्यांनी लुटले. अंबादेवीच्या गाभाऱ्यात मात्र ते पोहचू शकले नाही, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. 1630 साली देवीचे भक्त जनार्दन स्वामी यांनी अंबादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी अंबादेवी मंदिरालगत एकविरादेवी मंदिराची स्थापना केली. विशेष म्हणजे एकवीरादेवीला मोठ्या देवीचा आणि अंबादेवीला लहान देवीचा मान आहे. 1898 साली मंदिराची मोठी दुरुस्ती अमरावतीकरांनी केली.

नर्तकींनी केली भरीव मदत

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्याकाळी मंदिर परिसरात राहणाऱ्या नर्तकींनी भक्कम अशी आर्थिक मदत केली होती आणि सोन्याचे दागिने देवीला अर्पण केले होते. मंगळसूत्र, बोरमाळ, नथ, कंबरपट्टा, एकदाणी, बाजूबंद, बिंदी, असे नानाविध अलंकार अंबादेवीला आहे. देवीचा मुखवटाही सोन्याने मढवलेले आहेत. नवरात्र हा अंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असून अश्विन शुद्ध प्रतिपदेला चार वाजता घटस्थापना होते. मंदिराच्या कळसावर ध्वजारोहण होते. नवरात्र महोत्सवात सुमारे 15 लाख भाविक अंबामातेचे दर्शन घेतात. नवरात्रीशिवाय दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला अंबामातेला विशेष साज चढवला जातो.

दसऱ्याला होते सीमोल्लंघन

नवमीला मंदिरात यज्ञ होतो आणि दसऱ्याला अंबामाता सीमोल्लंघन करते. तसेच फुलांच्या पायघड्या टाकल्या जातात. दसऱ्याला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे कसरतीच्या खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके होतात. त्यात युवक, युवती जिम्नॅस्टिक, मल्लखांब, दांडपट्टा असे अनेक साहसी खेळ खेळतात. यावर्षी कोरोनामुळे नवरात्रोत्सवात शांतता असली तरी अंबादेवी मंदिरात सर्व धार्मिक विधी केले जात आहेत.

Last Updated : Oct 17, 2020, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.