ETV Bharat / state

खेडोपाड्यात शाळेत गुरुजी नाहीत आणि आपण म्हणतोय भारत विश्वगुरू, कन्हैया कुमारची उपरोधिक टीका - Kanhaiya Kumar Troll Shinde Govt

Kanhaiya Kumar on Shinde Govt : छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आल्यानंतर तेथील नागरिकांना 450 रुपयात गॅस सिलिंडर मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केली होती. महाराष्ट्रात देखील भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार आहे. (Kanhaiya Kumar On LPG Cylinder) त्यामुळे येथील जनतेनंही आता मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे 450 रुपरय गॅस सिलिंडर द्यावं अशी मागणी करण्याचं आवाहन काँग्रेस कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार यांनी केले.

Kanhaiya Kumar Troll Shinde Govt
कन्हैय्या कुमार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 6:36 PM IST

Updated : Dec 6, 2023, 7:38 PM IST

नया अकोला येथील सभेला संबोधित करताना कन्हैया कुमार

अमरावती Kanhaiya Kumar on Shinde Govt : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार हे अमरावती शहरालगत असणाऱ्या नया अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेलेले नया अकोला येथील रहिवासी पिरकाजी खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या काही अस्थींना नया अकोला या गावात आणले होते. या अस्थी गावात एका कलशामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. (Kanhaiya Kumar Naya Akola Meeting) अमरावतीत बाबासाहेब आंबेडकरांच्या नया अकोला येथील अस्थिकलशाचे दर्शन घेऊन खास अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आयोजित या अभिवादन सोहळ्याला कन्हैया कुमार यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, विचारवंत कैलास कमोद प्रामुख्याने उपस्थित होते.

खासदारकीसाठी दलित असल्याचे खोटे प्रमाणपत्र : पूर्वी आपली जात लपविली जायची. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आता तर ज्यांना खासदार व्हायचे आहे असे लोक चक्क दलित असल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खटाटोप करतात आणि निवडून देखील येतात, असे कन्हैया कुमार यांनी सभेला संबोधित करताना म्हणताच सभेतून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आज 450 रुपये सिलिंडर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर जाऊन सर्व महिलांनी बसावे. विशेष म्हणजे, यावेळी हनुमान चालीसा देखील सोबत घेऊन जावा असा टोला देखील कन्हैया कुमार यांनी लगावला.

मतांचा अधिकार हा गिफ्ट नव्हे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे देशातील सर्वसामान्य व्यक्तीला बहाल केले आहे. इथे विदर्भात देखील विदर्भाची जमीन ही विदर्भातील लोकांची नसून निजामांची होती. भारतीय संविधानाने मात्र सर्व भारतीयांना संवैधानिक अधिकार दिला आणि संविधान निर्मितीतूनच हा भारत देश निर्माण झाला. आज आपल्याला मतांचा जो काही अधिकार मिळाला आहे तो गिफ्ट नव्हे तर अनेकांनी दिलेल्या आहुतीनंतर आपल्याला घटनेच्या माध्यमातून वरदान स्वरूपात मिळाला असल्याचं कन्हैया कुमार म्हणाले.

शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी लढाई : आज आम्ही भारतीय जो काही कर भरतो आहे यातून देश समृद्ध आणि विकसित होतो आहे. असे असताना आज सर्वसामान्य व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. ज्यांच्याजवळ पैसा तोच निवडणूक लढवतो. घराणेशाही आपल्या लोकशाहीत दिसत आहे. खरंतर शाहू, फुले आणि आंबेडकरांचे विचार समोर नेण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, असे देखील कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.

गरिबांचे हक्क डावलण्याचा डाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई, वडिलांची त्यांच्या शाळेत मुलाखत घेऊन बाबासाहेबांना शाळेत प्रवेश दिला जाण्याची पद्धत असती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच शिकू शकले नसते. आज मात्र पालकांचा इंटरव्ह्यू घेऊन चिमुकल्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. सध्या भारतात सर्वसामान्यांचे हक्क अधिकार हिरावून घेण्याचा डाव आखला जात आहे. आज 80 कोटी जनता राशन मिळावे यासाठी राशन दुकानासमोर रांगा लावून उभे आहेत. देशाचे हे चित्र अतिशय गंभीर आहे. खरंतर अनेक गावांमध्ये शाळेत गुरूजी नाही आणि आपला भारत विश्वगुरू होतो आहे, असे जे काही बोलले जात आहे ते सर्व हास्यास्पद असल्याचे देखील कन्हैया कुमार म्हणाले.

हेही वाचा:

  1. मराठा आरक्षण टिकणार का? क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
  2. बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, शिक्षण विभागातील 3 तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
  3. रोजगार हमीवर काम करणाऱ्याला परमनंट करता येणार नाही, हायकोर्टाची स्पष्टोक्ती

Last Updated : Dec 6, 2023, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.