अमरावती : शिर्डीच्या साईबाबांना मुसलमान घोषित करण्याचे षडयंत्र ( Conspiracy to declare Sai Baba a Muslim ) सध्या आपल्या देशात सुरू आहे. सबका मालिक एक है म्हणणाऱ्या साईबाबांच्या मंदिरात कोणी मुसलमान आत जात नाही. मात्र त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले तर साईबाबाच्या मंदिरात भविष्यात साईबाबांची मूर्ती राहणार नाही. त्या ठिकाणी मुस्लिम नमाज पडतील, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचारण महाजार यांनी केले. साईबाबा ट्रस्टची संपूर्ण संपत्ती ही मुस्लिमांची होईल तसेच ज्या ज्या ठिकाणी साईबाबांचे मंदिर आहे, ते सर्व मंदिर मशिदीत रुपांतरीत होतील. त्यामुळे हिंदूंना सावध राहण्याची गरज आहे. ( Hindu Hunkar Sabha held at Badnera )
साईबाबा हे हिंदूच : हिंदू व्यक्तीसमोर साईबाबा हे अल्ला मालिक हे म्हणायचे तर मुस्लिम व्यक्तीसमोर भगवान मालिक है असे सांगायचे. वास्तवात साईबाबा हे जन्माने आणि कर्माने हिंदूच होते. मुस्लिमांच्या मशिदीचे साईबाबांनी मठात रूपांतर केले आणि हेच मठ द्वारकामाई नावाने ओळखल्या जाते. या द्वारकामाईमध्ये सतत धुनीपेटवली जाते. ही दुधी म्हणजे नागा साधूंचे लक्षण आहे. असे देखील कालीचरण महाराजांनी ( Kalicharan Maharaj ) यावेळी सांगितले.
जात सोडून सगळे हिंदू व्हा : आज हिंदुत्ववादी पक्ष सोडून इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याला कुठल्याही जातीच्या मेळाव्याचे आमंत्रण दिले तर तो पटकन होकार देतो. मात्र हिंदू सभेचे निमंत्रण दिले तर तो सभेला यायला अजिबात तयार होत नाही. खरंतर हिंदूंना एक व्हायचे असेल तर जातीची बंधने त्वरित तोडणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे हिंदूंनी आता जात पात सोडावी आणि हिंदू म्हणूनच संघटित व्हावे असे आवाहन देखील कालीचरण महाराज यांनी केले.
देशात हिंदूंचे राज्यात आणणार समृद्धी : आपल्या देशाचा राजा हा हिंदूच हवा. ( king ofcountry should be Hindu) यामुळे आपल्या भागातील आमदार खासदार हा कट्टर हिंदूच निवडून देण्याची जबाबदारी सर्व हिंदूंची आहे. मुस्लिमांप्रमाणे हिंदूंनी देखील व्होट बँक होण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वजण एकत्रित या आणि देशात हिंदू राज्य स्थापित करण्यास सज्ज व्हा असे देखील कालीचरण महाराज या सभेत म्हणाले. हुंकार सभेला भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्यासह बडनेरा परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे सरकारचे काम चांगले : जो हिंदू हिताच्या गोष्टी करेल त्या सरकारला आमचा पाठिंबा असेल असे कालीचरण महाराज यांनी म्हटले ( Kalicharan Maharaj On Hinduism ) आहे. त्याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या कामाचे कौतूकही केले आहे. उद्धव ठाकरेंना आम्ही काय सल्ला देणार आत्ता सल्ला देऊन काय उपयोग त्यांचे सरकार गेले आहे. शिंदे सरकार चांगले काम करत आहे. असे कालीचरण महराज यांनी म्हटले आहे.