अमरावती - आपल्या विविध आंदोलनांनी, वक्तव्यानी सातत्याने चर्चेत राहणारे बच्चू कडू यांचे वन्यजीव प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे बच्चू कडू हे नेहमी मेळघाटात जात असतात. अशाच प्रकारे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कुटूंबासह चिखलदऱ्यात जिप्सीवरून जंगलसफारीचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्या पत्नी प्रा. नयना कडूही उपस्थित होत्या. यावेळी बच्चू कडू यांनी वन्यजीव सरंक्षण, संवर्धन अशा विषयावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यमंत्री बच्चू कडू हे शनिवारी चिखलदरा येथे गेले होते. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू हे त्यांच्या पत्नीसह मेळघाटमधील कोलकासला गेले असता, त्यांनी चंपाकली नावाच्या हत्तीणीला दत्तक घेतले होते.
राज्यमंत्री बच्चू कडू यांची कुटूंबासह जंगलसफारी
बच्चू कडू हे नेहमी मेळघाटात जात असतात.अशाच प्रकारे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कुटूंबासह चिखलदऱ्यात जिप्सीवरून जंगल सफारीचा आनंद घेतला.