अमरावती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालणे आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाच सरंक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांनी इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार सर्वांनी करावा -
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवतेची महान मूल्ये संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहेत. संविधानाच्या या चौकटीला धक्का लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, किशोर बोरकर, अशोक दहिकर, ज्येष्ठ पत्रकार अॅड. दिलीप एडतकर, नाना नागमुखे, उमेश घुरडे, रामभाऊ पाटील, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, प्रफुल्ल गवई, राजकुमार मून, कमल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.