अमरावती : आज आपला भारत देश जगात विविध आघाड्यांवर विकासाचा झेंडा फडकवत आहे. देश आणखी समृद्ध व्हावा, या उद्देशाने नव्या संशोधनाला चालना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. युवकांमधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा तसेच त्यातून विकासाची नवी वाट खुली व्हावी यासाठी आपल्या विशेष अशा संशोधनाचे पेटंट प्रत्येकाला घेता येण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. संशोधन ही काळाची गरज असल्याचे मत अमरावतीच्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून सेवानिवृत्त झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक डॉक्टर विजया सांगावार यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विद्यापीठांमध्ये पेटंट या विषयावरील विशेष अभ्यासक्रमाचा समावेश करावा असे पत्राद्वारे कळविले आहे.
विशेष म्हणजे विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात पेटंट हा विषय शिकवल्या तर आपल्या युवकांच्या दूरदृष्टीला मिळेल. त्यांच्या कर्तुत्वाला मोठी संधी मिळेल. हा अभ्यासक्रम अतिशय गरजेचा असून तो सर्व विद्यापीठांमध्ये लागू व्हावा असा संपूर्ण प्रस्तावच 11 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाकडे सादर केला होता. - प्रा. डॉ. विजया सांगावार
प्रस्तावाची शासनाने घेतली दाखल : प्राध्यापक डॉ. विजया संगावार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ दखल घेतली आहे. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पेटंट संदर्भात युवकांना संपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी या विषयाचा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा आदेश दिले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 15 मार्च 2023 रोजी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पेटंट संदर्भातील अभ्यासक्रमा संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाही बाबत अहवाल शासनाकडे सादर करावा, असे पत्र सुद्धा दिले आहे.
समाजाला असा होईल उपयोग : खरंतर अशिक्षित व्यक्ती देखील त्याने लावलेल्या विशेष अशा शोधाचे पेटंट आपल्या नावावर करू शकतो. मात्र सुशिक्षित असणाऱ्या तरुणांना पेटंट नेमके काय आहे? ते कसे आपल्या नावावर करता येतं याबाबत कुठलीच माहिती नाही. आता शासनाने मी सादर केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून सर्व विद्यापीठांना या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ही खरोखरच आनंदाची बाब असल्याचे प्राध्यापक डॉ. विजया संघावार 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या. पेटंट बाबत आजच्या युवकांना संपूर्ण माहिती मिळाली तर, अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करण्यास समर्थ होतील. बाहेर कुठे रोजगार मागण्यापेक्षा ते अनेकांना रोजगार देण्यास सक्षम होतील असा विश्वास देखील प्रा. डॉ. विजया सांगावार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -