अमरावती - प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती शहरात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी लाभार्थ्यांना थाळी वाढून दिली. मात्र, त्यांनी स्वतः शिवभोजनाची चव चाखली नाही.
हेही वाचा -VIDEO : कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताकदिनीच सचिवाला दिला चोप
शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीसह अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथील उपाहारगृह आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय येथे शिवभोजन थाळी योजनेचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शेतकरी उपाहारगृहात शिवभोजन थाळीचा शुभारंभ केला. त्यांनी स्वतः शिवभोजनाची थाळी वाढून लाभार्थ्यांना दिली. तसेच, उपाहार गृहाची पाहणी करून त्यांनी उपहारगृहात नियमित स्वच्छता राखून शुद्ध अन्नपदार्थ गरीब व गरजू व्यक्तींना देण्याच्या सूचना भोजनालयाच्या संचालकांना दिल्या. या वेळी, विभागीय आयुक्त सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर संचालक प्रफुल राऊत, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महिला वाणात देतात मातीचे भांडे
किमान समान कार्यक्रमातून होणार सर्वांगीण विकास - यशोमती ठाकूर
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत, रिक्त पदांची भरती, महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे मोफत शिक्षण आणि एक रुपयात उपचार, अशा योजना किमानसमान कार्यक्रमातून अंमलात आणल्या आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, विभागीय आयुक्त पियूष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस निरीक्षक डॉ. हरी बालाजी एन. हे उपस्थित होते.
ट्वीटरद्वारे व्यक्त केल्या भावना
-
१९८९-९० ला ज्या मैदानावर ध्वजसंचालनात विद्यार्थी म्हणून सहभागी झाले आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारतानाचा क्षण अतिशय भावुक होता. pic.twitter.com/wwI1M9LIX5
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">१९८९-९० ला ज्या मैदानावर ध्वजसंचालनात विद्यार्थी म्हणून सहभागी झाले आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारतानाचा क्षण अतिशय भावुक होता. pic.twitter.com/wwI1M9LIX5
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 26, 2020१९८९-९० ला ज्या मैदानावर ध्वजसंचालनात विद्यार्थी म्हणून सहभागी झाले आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारतानाचा क्षण अतिशय भावुक होता. pic.twitter.com/wwI1M9LIX5
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 26, 2020
1989-90 साली ज्या मैदानावर ध्वज संचालनात विद्यार्थी म्हणून सामील झाले, आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारताना भावनिक क्षण होता, असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.