अमरावती - श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा शिबीर उद्घाटन सोहळ्यात आज केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या समोर मलखांब, रोप मलखांब, जिम्नॅस्टिकची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
तरुणींनी रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करतातच अनंत क्रीडा सभागृहत टाळ्यांचा कडकडाट झाला. मुलांच्या मल्लखांबचे प्रत्याक्षिके केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांसह जम्मूचे खासदार जुगल शर्मा यांनी आपल्या सेलफोनमध्ये टिपले. जिम्नॅस्टिक आणि झुंबाचेही आकर्षक असे सादरीकरण यावेळी झाले.
सोहळ्याला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवी राणा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत मराठे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक श्रीकांत चेंडके आदी उपस्थित होते.