अमरावती - एमपीएससीच्या विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी घेतलेली भूमीका निषेधार्थ अशीच होती. मी त्या भूमिकेचा विरोध केला. मला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. मात्र, आता चार दिवसानंतर राजकीय नेत्यांच्या दबावात येऊन माझ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करणायर आले आहे. या पाच पैकी फोघे आंदोलनस्थळी सुद्धा नव्हते तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल करणे राजकीय सुडबुद्धी असून आमच्यावर असा अत्याचार कराल तर आम्ही आणखी उफाळून येऊ, असा इशारा भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.
'ती' स्वाभाविक प्रतिक्रिया -
युवक, युवतींना लाठ्या मारल्या जात आहेत. एकाच गाडीत त्यांना कोंबून भरले जात आहे. यात आपले मुले असते तर काय प्रतिक्रिया आली असती असा प्रश्न उपस्थित करत डॉ. अनिल बोंडे पोलीस निरीक्षक चोरमाले माझ्याशी आगाऊ भाषेत बोलले त्यामुळे माझी जी प्रतिक्रिया उमटले ती अगदी स्वभावीक होती. आज माझ्या बोलण्याचा बाऊ केला जातो आहे. पोलिसांप्रती मला आदर आहे. मात्र, चिरमालेंसारख्या पोलिसांविरोधात जे बोललो ते चुकीचे नव्हते असेही डॉ. अनिल बोंडे यांनी म्हंटले आहे.
चार दिवसाने पाच जणांवर गुन्हे दाखल -
11 मार्चला पंचवटी चौकात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता. त्यावेळी घटनास्थळी भाजपचे डॉ अनिल बंडे यांच्यासह प्रणित सोनी, आणि बदल कुळकर्णी पोचले होते. यापैकी पोलिस निरीक्षक चोरमाले यांच्याशी केवळ डॉ. अनिल बोंडे यांचा वाद झाला होता. डॉ. बोंडे यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले होते. मात्र, चार दिवसानंतर आज डॉ. अनिल बोंडे, प्रणित सोनी, बदल कुळकर्णी यांच्यासह भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आणि जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात पोलीस यंत्रणा हतबल -
आम्ही आर आर पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे गृहमंत्री पाहिले आहेत. मात्र, आजच्या राज्यकर्त्यांनी गृहयंत्रणा हातबक करून टाकली आहे. पोलिसांच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. सचिन वाझे सारखा सहायक पोलिस निरीक्षक असणाऱ्या व्यक्तीला क्राईम इंटिलीजन्सचा प्रमुख पदावर बसवले जाते. या वाझें मुळे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत आहे. या अशा व्यक्तीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री समोर येतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणले.