ETV Bharat / state

हायकमांडने आदेश दिला असता तर अमरावतीतून निवडणूक लढवावी लागली असती - यशोमती ठाकूर - यशोमती ठाकूर अमरावती सत्कार

अमरावतीच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांचा अमरावती महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी अमरावतीचा विकास करण्याचे आश्वासन दिले.

यशोमती ठाकूर यांचा सत्कार समारंभ
यशोमती ठाकूर यांचा सत्कार समारंभ
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:43 AM IST

अमरावती - विधानसभा निवडणुकीवेळी अनेक षडयंत्रे रचण्यात आली. मी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा अनेकांचा हट्ट होता. आमदार डॉ. सुनील देशमुखांबद्दल असणाऱ्या आपुलकीमुळे अमरावतीतून निवडणूक लढवण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मात्र, पक्षाच्या हायकमांडने जर आदेश दिला असता तर मला अमरावतीतून निवडणूक लढवावी लागली असती, असे महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले. अमरावती महानगरपालिकेत ठाकूर यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

यशोमती ठाकूर यांचा सत्कार समारंभ

अमरावतीच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांचा अमरावती महापालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. ज्या मतदारसंघात मी कामे केली आहेत. तो माझा हक्काचा मतदारसंघ आहे. असे ठिकाण सोडून अमरावतीतून निवडणूक लढवणे माझ्या मनाला न पटणारे होते, असे ठाकूर म्हणाल्या. भाजपचे आमदार असलेल्या देशमुखांबद्दल आपल्याला आदर आणि आपुलकी आहे.

हेही वाचा - 'देशातील नागरिकांचे नागरिकत्व नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे ठरवू शकणार नाही'
'मी पहिल्यांदाच अमरावती महापालिकेत आले आहे. माझ्या मतदारसंघात माझे जन्मगाव ज्या ठिकाणी आहे, त्या गावातील ग्रामपंचायतीची इमारत महापालिकेच्या इमारतीपेक्षा सुसज्ज आहे. येणाऱ्या काळात अमरावती महापालिकेची इमारतही सुसज्ज झालेली दिसेल. भगवान श्रीकृष्ण अमरावतीत आल्याचा उल्लेख पुरणात आहे. आपले अमरावती शहर विकसित व्हावे यासाठी मी कायम पुढाकार घेण्यास तयार आहे, असे सत्काराला उत्तर देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या.

यावेळी महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, आयुक्त संजय निपाणे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती बाळासाहेब भूयार उपस्थित होते.

नेमका हट्ट कोणचा?
दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी नेमका कोणी हट्ट केला होता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महापालिकेच्या सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अनेक षड्यंत्र रचण्यात आले. मी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा अनेकांचा हट्ट होता. पक्षाच्या हायकमांडने जर प्रेशर आणले असते तर मला अमरावतीतून निवडणूक लढावी लागली असती. मात्र डॉ. सुनील देशमुखांवर असणाऱ्या प्रेमामुळे अमरावतीतून लढण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती असे महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती महापालिकेत सत्कार स्वीकारताना म्हटले.

Body:अमरावतीच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांचा आज अमरावती महापालिकेत सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू आयुक्त संजय निपाणे ,माजी महापौर मिलिंद चिमोटे,विलास इंगोले, विरोधीपक्षनेते बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती बाळासाहेब भूयार प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या मी पहिल्यांदाच अमरावती महापालिकेत आज आली आहे. माझ्या मतदारसंघात माझे जन्मगाव ज्या ठिकाणी आहे त्या गावातील ग्रामपंचायतीची इमारत महापालिकेच्या इमारती पेक्षा सुसज्ज आहे. येणाऱ्या काळात महापालिकेची इमारतही सुसज्ज झलेली दिसेल. अमरावती हे आंबदेवीचे शहर आहे. भगवान श्रीकृष्ण अमरावतीत आल्यच्या उल्लेख पुरणात आहे. आपले अमरावती शहर हे आनखी विलसित व्हावे यासाठी मला आपण म्हणाल,सांगाल त्यासाठी पुढाकार घेण्यास माझी तयारी असल्याचे यशोमती ठाकुर म्हणाल्या.
विधानसभेची निवडणूक मी अमरावती मतदारसंघातून लढवावी यासाठी अनेकांनी हट्ट धरला होता काहींनी तसेच षड्यंत्र ही रचले होते. खरं सांगायचं तर अमरावतीत डॉ. सुनील देशमुखांवर असणाऱ्या प्रेमामुळे माझी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढायची अजिबात इच्छा नव्हती. ज्या मतदारसंघात मी कामे केली आहेत जो माझा हक्काचा मतदारसंघ आहे तो मतदार सोडून अमरावतीत येणे हा विषयच नव्हता असे यशोमती ठाकुर यावेळी म्हणाल्या.

नेमका हट्ट कोणचा?
दरम्यान यशोमती ठाकूर यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी नेमका कोणाचा हट्ट होता असा सवाल उपस्थित करीत महापालिकेच्या सदस्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना मध्ये चांगलीच चर्चा रंगली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.