ETV Bharat / state

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, आरोपीला अटक - अमरातील जिल्हा लेटेस्ट न्यूज

शेजाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचलपूर तालुक्यातील कुष्ठा खुर्दमध्ये ही घटना घडली असून, या प्रकाराने गावात खळबळ उडली आहे. काठीने मारहाण करत पतीने पत्नीची हत्या केली. राहुल गौतम गायकवाड वय 30 रा. कुष्ठा खुर्द असे आरोपीचे नाव असून, पथ्रोट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

author img

By

Published : May 23, 2021, 8:50 PM IST

अमरावती - शेजाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचलपूर तालुक्यातील कुष्ठा खुर्दमध्ये ही घटना घडली असून, या प्रकाराने गावात खळबळ उडली आहे. काठीने मारहाण करत पतीने पत्नीची हत्या केली. राहुल गौतम गायकवाड वय 30 रा. कुष्ठा खुर्द असे आरोपीचे नाव असून, पथ्रोट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल गायकवाड याने दोन महिन्यांपूर्वी गावातच अमरावती येथील एका महिलेशी विवाह केला होता.सदर महिला पूर्वीच विवाहित असल्याने तिला दोन मुले आहेत. ही महिला आशा वर्कर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. तर आरोपी राहुल गायकवाड हा मजुरीचे काम करत होता.

अनैतिक संबंधाच्या संशायातून पत्नीची हत्या

राहुल गायकवाड व त्याची पत्नी दोन महिन्यांपासून कुष्ठा खुर्द येथे राहात होते. मात्र त्याच्या पत्नीचे शेजारी राहाणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय राहुलला होता. या संशयातून राहुलने त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केली. या मारहाणीमध्येच तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पोलीस पाटील सविता धनराज गोंडचोर यांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - ब्लॅक, व्हाईटसह ग्रीन, रेड, पिंक आणि ब्लू फंगसचाही धोका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.