ETV Bharat / state

अमरावतीच्या कामगार कार्यालयासमोर शेकडो नागरिकांची तुफान गर्दी

कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून कामगार नोंदणी कार्यालय बंद होते. परंतु आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीमधील कामगार कार्यालयात कामगारांची नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून रखडलेली कामगार नोंदणी सुरू झाली खरी परंतु पुन्हा एकदा लोकांनी येथे नोंदणीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील मोझरी तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर येथे कामगार आपली नोंदणी करण्यासाठी येत असतात. मात्र हे काम कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत.

Hundreds of citizens standing in front of the Amravati labor office despite of covid norms
अमरावतीच्या कामगार कार्यालया समोर शेकडो नागरिकांची तुफान गर्दी.
author img

By

Published : Jun 18, 2021, 8:23 AM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ही आता कमालीची घटली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत अमरावतीमधील कामगार नोंदणीसाठी शेकडो पुरुष व महिलांनी तुफान गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. कुठलेही सोशल डिस्टंन्स येथे पाळण्यात आले नाही. त्यामुळे इतक्या लवकर या महिलांना कोरोनाचा विसर पडला की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून कामगार नोंदणी कार्यालय बंद होते. परंतु आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीमधील कामगार कार्यालयात कामगारांची नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून रखडलेली कामगार नोंदणी सुरू झाली खरी परंतु पुन्हा एकदा लोकांनी येथे नोंदणीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील मोझरी तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर येथे कामगार आपली नोंदणी करण्यासाठी येत असतात. मात्र हे काम कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. तसेच या कामगारांसाठी कुठलीही सुविधा कामगार कार्यालयाच्या वतीने केली नसल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.