ETV Bharat / state

आजीने दिले दीड वर्षीय चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याने चटके, अखेर दुर्दैवी मृत्यू - मेळघाटात बाळाचा मृत्यू

चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावातील राजरत्न जमूनकार असे मृतक बाळाचे नाव आहे. आजार झाल्याने त्याला रुग्णालयात न नेता घरीच पोटाला चटके दिले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही, अखेर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

मेळघाटातील 'त्या' बालकाचा अखेर मृत्यू
मेळघाटातील 'त्या' बालकाचा अखेर मृत्यू
author img

By

Published : Jun 6, 2021, 4:03 PM IST

Updated : Jun 10, 2021, 6:56 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील दोन वर्षीय चिमुकल्या बाळाला आजार झाल्याने रुग्णालयात न नेता त्याच्याच आजीने बाळाच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिले होते. ही संतापजनक घटना घडल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती. शिवाय चटके देणाऱ्या आजी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतरही बाळाच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर काल रात्री(शनिवार) त्या बाळाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मेळघाटमध्ये अंधश्रद्धेचे सत्र केव्हा थांबणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी

चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावातील राजरत्न जमूनकार असे मृतक बाळाचे नाव आहे. आजार झाल्याने त्याला रुग्णालयात न नेता घरीच पोटाला चटके दिले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही, अखेर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार

काय आहे प्रकार?

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खटकवली गावात राजरत्न जमुनकार या दोन वर्षीय बालकाची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे वडिलाच्या आजीने महिनाभरापूर्वी त्याच्या कानाला चटका दिला होता. त्यातही बाळाला बरं वाटत नसल्याने तिने बाळाच्या पोटावर चटके दिले. याप्रकारामुळे जखमी झालेल्या बालकाला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाच्या पोटावर गावातील भूमका बाबाने चटके दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र बाळाचे वडील रतन जमुनकार यांनी "माझा आईच्या आईने बाळावर उपचार करण्यासाठी चटके दिले" अशी माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा- 'घरात एकटीच करता धरता होती ओ..आता काय करायचं'.. मुळशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाची आर्त हाक

Last Updated : Jun 10, 2021, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.