ETV Bharat / state

मेळघाटात पारंपरिक होळी सणाला प्रारंभ

आदिवासी समाजात होळी सणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आज सकाळ पासूनच संपूर्ण मेळघाटात होळी सणाला सुरुवात झाली आहे. राज्यात होळीवर कोरोनाचे सावट असतानाही आदिवासी बांधव होलिकोत्सव उत्साहात साजरा करत आहेत.

आदिवासी बांधव नृत्य करताना
आदिवासी बांधव नृत्य करताना
author img

By

Published : Mar 28, 2021, 12:39 PM IST

Updated : Mar 28, 2021, 12:55 PM IST

अमरावती - आदिवासी समाजात होळी सणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे रविवारपासूनच संपूर्ण मेळघाटात होळी सणाला सुरुवात झाली आहे. येथून पुढील आठ दिवस हा होळी सण मेळघाटात साजरा होणार आहे. बाहेरगावी असलेले सर्व आदिवासी बांधव होळी सणाच्या पूर्वसंध्येला आपल्या गावी मेळघाटात येत असतात. होळीच्या आठ दिवसापूर्वी घराची साफसफाई, स्वच्छता रंगरंगोटी हे आदिवासी बांधव करतात. होळी सण साजरा केल्यानंतर पुढील आठ दिवस हे आदिवासी बांधव लोकांना फगवा मागतात. आपल्या आदिवासी नृत्याने अनेक आदिवासी बांधव जनजागृती करतात.

मेळघाटात होळी सणाला प्रारंभ.
मेळघाटात होळी सणाला प्रारंभ.

हेही वाचा - होळीच रंगीत चित्र, जाणून घ्या देशभरात कुठे, कशी साजरी केली जाते

पारंपरिक वेशभूषा कायम

मेळघाट हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे. या भागात 80 टक्के लोक हे स्थानिक आदिवासी बांधव आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशात त्या त्या भागातील वैशिष्ट्य आजही कायम आहे. कोरकू आदिवासी बांधवांचा पिढ्यानपिढ्या चालत असलेले पारंपारिक आदिवासी आजही कायम आहे. सर्व शुभ प्रसंगांमध्ये लग्नाच्या वेळी उत्सव समारंभात स्त्री-पुरुष समूहांमध्ये या नृत्याचा आनंद घेतात. प्रामुख्याने भडक बंडी, कोट, धोतर घालतात. तसेच डोक्यावर पगडी बांधून त्यात खोपा रोवला जातो. या नृत्यासाठी मुली व महिला लाल रंगाची साडी परिधान करून पारंपारिक अलंकार घालतात. होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मेळघाटच्या खोऱ्यात तयारी सुरू झाली आहे. अनेक आदिवासी पारंपारिक नृत्यांवर ताल धरत आहे.

आदिवासी बांधव नृत्य करताना .

हेही वाचा - 'पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते', खासदार राऊतांचा सरकारला घरचा आहेर

असा होतो होलिकोत्सव साजरा

दहा दिवस चालणाऱ्या या होळी सणाची मजा काही औरच असते. पहिल्या दिवशी शेतातील पीक आणि होलीकाचे पूजन केले जाते. येथे वेगवेगळ्या दिवशी होळी पेटवली जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागी आदिवासी नृत्य करत असतात. मेळघाटच्या गावांमध्ये मेघनाथ स्तंभ उभारला जातो. मेघनाथ हे आदिवासी समाजाचे दैवत असल्याने त्याची पूजा केली जाते. मोह फुलापासून काढण्यात आलेली दारू सेवन करण्यासाठी दिली जाते. किणकी, ढोलकी, बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर पारंपारिक नृत्य करत असतात. पळसाच्या फुलापासून नैसर्गिक रंग खेळण्यात येतो. होळीनिमित्त मेळघाटातील काराकोठा, कातकुंभ, भरू या गावात मोठी यात्रा सुद्धा भरते. यंदा कोरोनामुळे या यात्रा होणार नाही. सातपुडा पर्वत रांगांतून वाहणाऱ्या तापी नदीला आदिवासी दैवत मानतात, पूजा करतात. घाटाचा मेळ असलेल्या मेळघाटातील आदिवासीमध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहे. आदिवासींच्या सर्व जाती दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटातील होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Last Updated : Mar 28, 2021, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.