ETV Bharat / state

Hide Identity Of Bribe Takers : लाचखोरांची ओळख लपवा! कर्मचारी आणि अधिकारी महासंघाचे सरकारला पत्र - भ्रष्टाचार रोखण्याचे कायदे

भ्रष्टाचार रोखण्याचे कायदे कडक करा (Anti corruption laws), अशी मागणी होत असताना लाच घेताना किंवा अन्य कोणत्याही गुन्ह्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले (red handed arrests for accepting bribes). तर त्यांचे नाव आणि छायाचित्र जाहीर करु नये. त्यांची ओळख लपवा, अशी अजब मागणी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (letter to CM Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सर्वांच्या भुवया या मागणीमुळे उंचावल्या आहेत. (Latest news from Mumbai)

Hide Identity Of Bribe Takers
लाच घेताना अटक
author img

By

Published : Jan 7, 2023, 6:53 PM IST

मुंबई : सरकारी यंत्रणांशी संबंधित कामांसाठी लाच द्यावी लागू नये, (Anti corruption laws) यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करू नये, यासाठी भ्रष्टाचारविरोधी कायदा २०१८ (सुधारित) अंमलात आणला. राज्यात त्याचा काहीसा परिणाम दिसत असला, तरी भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी होताना दिसत नाहीत. एखाद्या राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भात लाचलुचपत आणि इतर गुन्ह्यांसंदर्भात कारवाई झाल्यावर (red handed arrests for accepting bribes) संबंधित विभाग किंवा लाचलुचपत विभाग यांच्याकडून कारवाई झालेल्या कर्मचारी, अधिकारी यांचे छायाचित्र प्रसिद्धी माध्यमांना दिले जाते. (letter to CM Shinde) कर्मचाऱ्यांची अशावेळी बदनामी होते. (Latest news from Mumbai)

हे तर मानवाधिकाराचे हनन : संबंधित कर्चमारी, अधिकारी न्यायालयीन लढाईत हा निर्दोष सुटतो. परिणामी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कुटुंबात आणि समाजात नाहक बदनामी होते. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर प्रतिष्ठा पुन्हा मिळत नाही. संबंधितांच्या मानवाधिकाराचे हनन होते आणि कुटुंबावरही मोठा अन्याय होतो. लाचलुचपत प्रतिबंधात्मक व इतर गुन्ह्यांतर्गत कारवाईनंतर संशयित आरोपींवर जोपर्यंत न्यायालयात दोष सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संशयितांचे नाव व फोटो माध्यमांमध्ये किंवा कोणत्याही व्यक्ती, विभागामध्ये सार्वजनिक करू नये. तसे राज्य शासनाने स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई यांनी पत्रातून राज्य शासनाकडे केली आहे. सरकार आता यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लाचखोरीत आघाडीचे विभाग :
पुणे - 155
नाशिक - 126
औरंगाबाद -122
ठाणे - 84
नागपूर - 74
अमरावती - 64
नांदेड - 60
एकूण - 727

लाचखोरीत सोलापूर जिल्हा आघाडीवर : अँटी करप्शन सोलापूर युनिटने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 25 कारवाया केल्या. त्यामध्ये 34 जणांना लाच घेताना अटक झाली आहे. महसूल विभागाच्या संशयित आरोपी लोकसेवकांवर 6 संशयितांना लाच घेताना अटक झाली आहे. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी महसुल खात्यात एकूण 4 कारवाया केल्या होत्या. भूमी अभिलेख विभागात 3 कारवाया केल्या आणि 4 जणांना अटक केली. पोलीस खात्यात 3 ठिकाणी कारवाया झाल्या आणि 3 जणांना लाच घेताना अटक झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विभागात 3 कारवाया आणि 3 आरोपी अटक. जिल्हा परिषद आरोग्य विभाग 1 कारवाई आणि 1 आरोपी अटक. महाराष्ट्र रस्ते विकास संस्था 1 कारवाई 2 संशयित आरोपी अटक. सोलापूर महानगरपालिका कारवाई 1 आणि आरोपी 1. खाजगी इसम कारवाई 2 आरोपी 3. कृषी खात्यात कारवाई 1 व आरोपी 1. पंचायत समिती कारवाई 1 आणि आरोपी 1. अशाप्रकारे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 25 कारवाया झाल्या असून, 34 संशयितांना लाच घेताना अटक झाली आहे.

11 संशयितांना लाच घेताना रंगेहाथ अटक : अँटी करप्शन सोलापूर युनिट कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 22 ठिकाणी अँटी करप्शनच्या कारवाया झाल्या. त्यामध्ये शहर आणि ग्रामीण पोलिस दलात 7 ठिकाणी कारवाई झाली असून 11 संशयित पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. राज्य कर विभाग कारवाई 1 व आरोपी 1.ग्रामपंचायत कारवाई 3 आणि आरोपी 5.जिल्हा परिषद कारवाई 2 आरोपी 2.शिक्षण संस्था कारवाई 1 आरोपी 2.शासकीय तंत्रनिकेतन कारवाई 1 आरोपी 1.नगरपंचायत कारवाई 2 आरोपी 2.सोलापूर महानगरपालिका कारवाई 1 व 2 संशयीत कर्मचारी अटक. आरोग्य विभाग कारवाई 1 व लाच घेताना अटक आरोपी 1.महसूल खात्यात कारवाई 1 व अटक आरोपी एक, असे विविध ठिकाणी अँटी करप्शन विभागाच्या अधिकारी- कर्मचारी यांनी नजर ठेवून प्राप्त तक्रारीनुसार 22 ठिकाणी कारवाया केल्या आणि 30 संशयित लोकसेवकांना लाच घेताना बेड्या ठोकल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.