अमरावती - शहर आणि लगतच्या परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे अमरावतीकरांची तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला.
हेही वाचा - अमरावतीमध्ये एका फोनवर पोलीस महिलांना थेट घरी सोडणार
शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी सकाळी बडनेरासह अमरावती लगतच्या अनेक गावांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. सायंकाळी 8 च्या सुमारास बडनेरा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. रात्री 9 च्या सुमारास अमरावती शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अमरावती शहराच्या काही भागात दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस कोसळला. काही भागात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. या पावसामुळे शेतातील तुरीला फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - खचला पाया, खचल्या भिंती, गाव बुडीत क्षेत्रात म्हणून प्रशासनाने नाकारली शाळेची दुरुस्ती