अमरावती भाजपाचे आमदार प्रवीण पोटे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृतीसाठी प्रचार रथ तयार केला होता रथाच्या तिन्ही बाजुला तिरंगा अभियानाचे बॅनर लावले होते बॅनरवर नरेंद्र मोदी व आमदार प्रवीण पोटे यांचे फोटो होते शुक्रवारी सकाळी प्रचार रथ मसानगंज परिसरात जात असतांना हॉटेल आदर्श समोर उभा होता त्या वेळी वसीम ने रथावरील फोटो पाहिले आणि या सरकारने आमचे धान्य कमी केले असे म्हणत गाडीच्या चावीने बॅनर फाडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे
असा लागला आरोपीचा शोध घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रथ चालकाने भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली तेव्हा तेथे एक युवक रथा वरील बॅनर फाडत असल्याचे दिसून आले पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे राग अनावर झाल्याने बॅनर फाडल्या ची कबुली त्याने पोलिसांना दिली
काय होती घटना तिरंगा मोहीम यशस्वी व्हावी यासाठी अमरावती शहरात जनजागृतीसाठी निघालेल्या प्रचार रथावरील बॅनर फाडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येतानाच खळबळ उडाली होती प्रचार रथावर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनांची संबंध आहे का याचा तपास देखील पोलिसांनी करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती
हेही वाचा Firing On Akola Police अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाइल पकडले