ETV Bharat / state

अमरावतीच्या बारावी टॉपरला व्हायचे आहे जिल्हाधिकारी

author img

By

Published : Jul 19, 2020, 4:22 PM IST

अमरवातीत बारावीच्या परिक्षेत विज्ञान शाखेतून अव्वल आलेल्या मोहन तिर्थंकार याला जिल्हाधिकारी व्हायचे आहे, असे तो म्हणाला.

mohan
mohan

अमरावती - माझा स्वप्न आणि ध्येय हे जिल्हाधिकारी होणे आहे. आज मी विज्ञान शाखेतून चांगले गुण संपादन करून बारावी उत्तीर्ण झालो. आता पुढे मला विज्ञान शाखेतून पदवी मिळवायची असून त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायच असल्याचे बारावीत विज्ञात शाखेतून अमरावतीत अव्वल आलेला मोहन तीर्थंकर म्हणतो. या यशाबाबत त्याने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना आपल्या यशाचे श्रेय गुरुजन आणि आई-वडीलांना दिले आहे.

अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा मोहन विद्यार्थी आहे. मोहनला गणितात पैकीच्या पैकी गुण असून फिजिक्समध्ये 98, केमेस्ट्रीमध्ये 99, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 195, एन्वायरमेंट एज्युकेशनमध्ये 50 आणि इंग्रजी विषयात 93 गुण मिळाले आहेत. दहावीत 95 टक्के गुण मिळविणाऱ्या मोहनने बारावीत चांगले गुण घेतल्याने वडील मुरलीधर तीर्थंकर, आई महनंदा, भाऊ योगेश या संपूर्ण कुटुंबासाठी निकालाचा दिवस उत्सवासारखा होता. मोहनने वडील मुरलीधर तिर्थंकर हे चांदुर रेल्वे तालुक्यातील जावरा या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत तर आई टिटवा या गावातील शाळेत शिक्षिका आहेत. मोठा भाऊ योगेश हा अभियंत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. सातव्या इयत्तेपर्यंत मोहनचे शिक्षण चांदुर रेल्वे येथील शाळेत झाले. तिर्थंकर कुटुंब अमरावतीत राहायला आले आणि मोहन आठव्या इयत्तेत पासून दहावीपर्यंत अमरावतीच्या शाळेत शिकला. विज्ञान शाखेतून बारावीत अव्वल येणारा मोहन म्हणतो, बीएस्सी करुन स्पर्धा परीक्षेची तयारी कारायची आहे. भविष्यात क्लेकटर होणे हे ध्येय मी गाठणार, असे मोहन म्हणाला.

मुलाच्या या यशाबाबत मुरलीधर तीर्थंकर यांनी त्याला जे काही भविष्यात करायचे आहे त्यासाठी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. अभ्यासाचे नियोजन करून त्याने अभ्यास केला असे मोहनचे वडील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.