अमरावती - चांदूर रेल्वे शहरातील फुटपाथ, टपरीधारक व फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी 14 सप्टेंबरपासून प्रशासनाविरोधात चांदूर रेल्वे येथील नगर परिषद समोर नॅशनल हॉकर्स फेडरेशन अमरावती जिल्हा, शाखा चांदूर रेल्वे तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. परंतु 3 दिवस उलटूनही आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आता हॉकर्स फेडरेशन आक्रमक झाली असून आज 17 सप्टेंबरपासून शहरात बेमुदत फळ व भाजीपाला विक्री बंद केली. यामुळे आज बाजारात सगळीकडे शुकशुकाट पाहावयास मिळाला. सर्वपित्री दर्श अमावस्येच्याच दिवशी फळ, भाजीपाला विक्री बंद केल्याने याचा त्रास नागरिकांना झाला.
चांदूर रेल्वे शहरात हॉकर्सचे आंदोलन, बेमुदत फळ व भाजीपाला विक्री बंद
नगर परिषद समोर नॅशनल हॉकर्स फेडरेशन अमरावती जिल्हा, शाखा चांदूर रेल्वेकडून विविध मागण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. हॉकर्सचे साहित्य जप्त करणे, दंड वसूल करणे व प्रतिज्ञापत्र लिहून घेणे बंद करा, स्वनिधी योजनेचा लाभ सर्वच हॉकर्सला ताबडतोब देऊन कर्जपुरवठा करा आदींचा या विविध मागण्यात समावेश आहे.