अमरावती: हनुमान जयंती चैत्र महिन्यच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा केली जाते. अमरावती शहरालगत असणाऱ्या श्री क्षेत्र चांगापूर येथील श्री हनुमान मंदिरात आज हनुमान जयंतीच्या पर्वावर पहाटे पाच वाजता श्री हनुमानाला पंचपक्वानांसह बुंदीच्या लाडूंचा भोग चढविला जातो. साडेपाच वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. हा महाप्रसाद रात्री एक वाजेपर्यंत वितरित केला जातो. सुमारे 25 ते 30 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. विशेष म्हणजे पहाटे साडेपाच वाजता महाप्रसाद घेण्यासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित असतात.
पहाटे तीन वाजल्यापासून अभिषेक सोहळा: हनुमान जयंतीच्या पर्वावर आज पहाटे तीन वाजल्यापासून चांगापूर येथील हनुमान मंदिरात श्री हनुमान आला अभिषेक चढविण्यास सुरुवात झाली. दूध, दही, मध, पाणी, साखर अशा पंचामृतासह श्री हनुमंताला अभिषेक चढविण्यात आला. साडेचार वाजता हनुमान चालीसा पठण आणि पाच वाजता हनुमानाची आरती मंदिरात करण्यात आली. अभिषेक सोहळा आणि आरतीला पाचशेच्यावर भाविक मंदिरात पोहोचले होते.
दिवसभर चालतो महाप्रसाद: पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत चांगापूर येथील हनुमान मंदिरात महाप्रसाद वितरित केला जातो. अनेक भाविकांनी या महाप्रसादासाठी आपल्या परीने भाजीपाला, धान्य, दान दिले आहे. तीस क्विंटल पोळ्या, बारा क्विंटल तांदूळ, पंधरा क्विंटल डाळ आणि 18 क्विंटलची भाजी महाप्रसादासाठी केली जाते. अशी माहिती मंदिराचे विश्वस्त गोपालदास लढा यांनी दिली.
जागृत हनुमान अशी मान्यता: अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चांदापूर येथील श्री हनुमानाची मूर्ती जागृत असल्याची मान्यता आहे. दर्शनी वाडी आणि मंगळवारी या मंदिरात भाविकांची गर्दी असते. हनुमान जयंतीच्या पर्वावर पहाटे चार वाजल्यापासून मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते. हनुमान जयंतीला हनुमानाच्या दर्शनासाठी अमरावती शहरासह जिल्हाभरातील सुमारे 50 हजार भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
हेही वाचा: Hanuman Jayanti भक्तांची इच्छा पूर्ण करणारा सुपारी हनुमान मारुती बालरुपात देतो दर्शन