अमरावती - मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली.मेळघाटातील लवादा परिसरात गारपिटीमुळे जणू काश्मीरचे स्वरूप आले होते. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीकांचे नुकसान झाले आहे. मेळघाटमधील मका, गहू या पिकांना पावसाचा फटका बसला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे.या अवकाळी पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांना बसला आहे.या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडून गेले आहे. यामुळे संत्राच्या बागा उध्वस्त झाल्या आहे.तसेच काढणीला आलेला कांदा आणि गहू सुद्धा खराब झाला आहे.
हेही वाचा - राज्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जिल्हयाला अवकाळी पावसाचा फटका
जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस आणि गारपीट होत आहे. मेळघाटातील धारणी,चिखलदरा,बैरागड या परिसराला शेतीला फटका बसला आहे.अचलपूर तालुक्यात बहिराम,कारंजा,सारफापूर,सायखेड या गावांना पावसाची झळ बसली आहे.तसेच तिवसा तालुक्यातील भारसावडी,शेंदूरजना बाजार,धमंत्री या गावातील शेतीला अवकाळी पावसाची झळ बसली आहे.
हेही वाचा - शिवाजी पार्कची रोषणाई महिन्याच्या 'कलेक्शन'मधून करा; मनसेचा शिवसेनेला टोला