अमरावती - विदर्भात पुन्हा एकदा परतीचा पाऊस आला आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील हिरव्या मिरचीची पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बाजारात मिरचीला ६५ रुपये प्रति किलो भाव मिळत आहे.
मिरचीला प्रति किलो ६५ रुपये भाव मिळत असताना खर्च वजा जाता शेतकऱ्यांना नफादेखील चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता योग्य मार्गदर्शन घेऊन शेती करावी, असे मिरची उत्पादक शेतकरी प्रवीण खैरकार यांनी सांगितले. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेती फायदेशीर होते, असा अनुभव आल्याचे खैरकार यांनी सांगितले.