अमरावती - ग्रामपंचायत कर्मचारी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून नाल्यात वाहून गेला. ही घटना बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड खिराळा मार्गादरम्यान घडली. साहेब खाँ बनेर खाँ (वय 59) असे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - अमरावतीत पावसामुळे मातीच्या मूर्त्यांना फटका
पाय घसरला आणि होत्याचे नव्हते झाले
खिराळा, निमखेड बाजार, हिरापूर, चिंचोना व सावरपाणी या गावांना अंजनगाववरून जाण्याकरिता लखाड खिराडा हा मार्ग आहे. या मार्गात चांदसूर्या नाला आहे. त्या नाल्यावर कमी उंचीचा पूल असून नाल्याला पूर आला की पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे, पूर उतरेपर्यंत प्रवाशाना तासंतास ताटकाळत बासावे लागते. बुधवारी निमखेडचे साहेब खाँ बनेर खाँ अंजनगाववरून गावाकडे जात होते. दरम्यान चांदसूर्या नाल्यावरील पुलावर पाणी असताना त्यांनी गावातील गिऱ्हे नामक युवकाच्या सहाय्याने दुचाकी लोटत पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, असे करताना साहेब खाँ यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले व नाल्याच्या पुरात वाहून गेले.
हेही वाचा - आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता नाही, वंचितचे पुन्हा अर्धी समाधी आंदोलन