ETV Bharat / state

मेळघाटातील रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा पुरवा, आदिवासी विकासमंत्र्यांचे आदेश - जिल्हा परिषद

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठीही पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आले.

मंत्री डॉ. अशोक उईके सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणी करताना
author img

By

Published : Jul 5, 2019, 1:14 PM IST

अमरावती - मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांना रुग्णालयात तात्काळ आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात तसेच पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा केंद्रात उपलब्ध ठेवावा, असे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. मेळघाट आदिवासी बहुल धारणी तालुक्यातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल आकस्मित भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

मेळघाटातील रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा पुरवा - आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके

यावेळी मंत्री उईके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. औषधी विभागात सर्पदंश, विंचूदंश, श्वान चावल्याचे रोग प्रतिबंधक लस (अॅन्टीबॉयोटीक) उपलब्ध आहे का, याची तपासणी केली असता त्यांना लसीचा पुरेसा साठा आढळून आला. पावसाळयात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठीही पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आले.

मेळघाट क्षेत्रातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांना प्रसुतीसंदर्भातील सर्व आरोग्य सुविधा पुरवाव्यात. कुपोषित बालकाबाबत नियमित सकस आहार, तपासणी व औषधोपचार करण्यात यावेत, यासाठी महिला व बालविकास विभागाने सहकार्य करावे. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गरीब आदिवासी बांधवांवर तत्काळ औषधोपचार करण्याच्या सूचना यावेळी श्री. उईके यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या आहेत.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रभुदास भिलावेकर, प्रकल्प अधिकारी श्री. खिल्लारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक वाघमारे, मंत्र्यांचे स्वीय सहायक डॉ. अक्षय जव्हेरी, रविंद्र लहाने तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

Intro:मेळघाटातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रास
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची आकस्मित भेट

                  मेळघाटातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा पुरवा आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके

अमरावती अँकर

 : मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांना रुग्णालयात तत्काळ आरोग्य सुविधा पुरवाव्यात तसेच पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधी साठा केंद्रात उपलब्ध ठेवावा, असे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. 

मेळघाट आदिवासी बहुल धारणी तालुक्यातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल आकस्मिक भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रभुदास भिलावेकर, प्रकल्प अधिकारी श्री. खिल्लारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक वाघमारे, मंत्र्यांचे स्वीय सहायक डॉ. अक्षय जव्हेरी, रविंद्र लहाने तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी आदिवासी मंत्री उईके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. औषधी विभागात सर्पदंश, विंचूदंश, श्वान चावल्याचे रोग प्रतिबंधक लस (ॲन्टीबॉयोटीक) उपलब्ध आहे का, याची तपासणी केली असता लसीचा पुरेसा साठा आढळून आला. पावसाळयात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी पुरेसा औषधी साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. 

मेळघाट क्षेत्रातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांना प्रसुती संदर्भातील सर्व आरोग्य सुविधा पुरवाव्यात. कुपोषित बालकाबाबत नियमित सकस आहार, तपासणी व औषधोपचार करण्यात यावेत. महिला व बालविकास विभागाने यासाठी सहकार्य करावे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गरीब आदिवासी बांधवावर तत्काळ औषधोपचार करण्याच्या सूचना श्री. उईके यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्याBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.