अमरावती - मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेमधील थांबवलेले ठिबक सिंचनाचे ८० टक्के अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.
शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती करणे हा या अभियानाच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे. हे साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठिबक संच बसविण्यास उद्युक्त करणे व प्रोत्साहित करण्याचे काम कृषी विभागाने केले होते. मात्र, हे अनुदान आता थांबवले असल्याने शासनाने ते तात्काळ द्यावे, अशी मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.
हेही वाचा- स्थानिक कामगारांना काढून बिहारींना काम; अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार