ETV Bharat / state

Amravati Crime मध्यरात्री तरुणीचे अपहरण: अज्ञातस्थळी तीन महिने डांबून नराधमाने अत्याचार केल्याने झाली गरोदर - Girl kidnapped And Raped In Amravati

अचलपूर तालुक्यातील एका गावात 22 वर्षीय तरुणीचे मध्यरात्री अपहरण करून तिला तीन महिने अज्ञातस्थळी डांबून ठेवले. या तरुणीवर नराधमाने वारंवार बलात्कार केल्यामुळे ती गरोदर राहिली. तरुणीने स्वतःची सुटका करून ती घरी परतली. पीडितेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अज्ञात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

girl was kidnapped and raped
तरुणीचे अपहरण बलात्कार
author img

By

Published : Jan 13, 2023, 4:43 PM IST

अमरावती : अचलपूर तालुक्यातील गावातून मध्यरात्रीच्या वेळी नराधमाने तरुणीचे अपहरण करुन तिला अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याने खळबळ उडाली. या तरुणीवर नराधमाने अत्याचार केल्यामुळे पीडिता गरोदर राहिली आहे. या तरुणीने कशीबशी नराधमाच्या तावडीतून सुटका करुन घेत घर गाठले. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीचे 22 सप्टेंबरला अपहरण झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली होती. अखेर पीडित तरुणी 14 डिसेंबरला आपल्या गावी परतली आहे. मात्र पीडितेची प्रकृती बरी नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला.

पीडिता परतल्याची पोलिसांना माहितीच नाही : घरी परतल्यावर ती आजारी पडल्यामुळे तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून तिला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. रक्त तपासणी दरम्यान ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. या संपूर्ण प्रकाराबाबत त्या युतीचा जबाब घेऊन परतवाडा पोलिसांना पाठवण्यात आल्यानंतर या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली. दरम्यान मुलगी परत आली यासंदर्भात तिच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार दिली होती तशी ती घरी परत आली या बाबत कुठलीही माहिती दिली नाही. सदर युवती गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचा जबाब नोंदविला. डॉक्टरांनी युवतीकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.सामाजिक बदनामी होऊ नये म्हणून पिडीतेने व तिच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदवला जबाब अचलपूर तालुक्यातील या तरुणीचे अपहरण झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र तरुणी सुटका करुन घरी परतल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी याबाबतची कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात दिली नाही. मात्र पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडिता गरोदर असल्याचे उघड झाले. पीडितेचे लग्न झालेले नसल्याने अत्याचारातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा जबाब नोंद केला.

तीन महिन्यापूर्वी अपहरण अन् पीडिता चार महिन्याची गरोदर या प्रकरणातील पीडितेचे तीन महिन्यापूर्वी 22 सप्टेंबरला अपहरण झाले होते. अपहरणानंतर या तरुणीला अज्ञात आरोपीने अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे. मात्र तीन महिन्यापूर्वी अपहरण झालेली तरुणी चार महिन्याची गरोदर असल्याचे पीडितेच्या तपासणीवरुन उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय गौडबंगाल आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Minor Boy Raped Minor Girl धक्कादायक दहा वर्षांच्या मुलाने शेतात घेऊन जात केला आठ वर्षीय मुलीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.