ETV Bharat / state

अमरावती : तिच्या कुटुंबीयांचा होता प्रेमाला विरोध, त्याने गळा चिरून केली प्रेयसीची हत्या - मुधोळकरपेठ परिसर

अर्पिताच्या घरच्यांचा प्रेमाला विरोध असल्याच्या कारणावरून आरोपी तुषार मस्करे याने मुधोळकरपेठ परिसरात मैत्रिणीसोबत शिकवणीवरून परत येणाऱ्या अर्पितावर चाकूने १७ वार करत तिची निर्घृण हत्या केली.

यसीची हत्त्या
author img

By

Published : Jul 10, 2019, 9:32 AM IST

Updated : Jul 10, 2019, 9:48 AM IST

अमरावती - कवठा बहाळे येथील रहिवासी अर्पिता ठाकरे आणि मलकापूर पांढरी येथे राहणाऱ्या तुषार मस्करे यांच्या प्रेमप्रकरणाला अर्पिताच्या कुटुंबीयांचा विरोध होता. यामुळे प्रियकर तुषारने तीची गळा चिरून निर्घृन हत्या केली. एवढेच नाही, तर त्याने तिच्यावर चाकूचे तब्बल १७ वार केले आहेत. ही घटना अमरावतीतील चुनाभट्टी ते मुधोळकरपेठ परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरातील युवकांनी तुषारला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

परिसरातील युवकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले

मुधोळकरपेठ परिसरात मंगळवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत शिकवणीवरून परत येणाऱ्या अर्पितावर तुषारने चाकूने वार केला. मुधोळकरपेठ परिसरातील युवक तुषारला रोखण्यासाठी धावेपर्यंत त्याने अर्पिताच्या अंगावर चाकूने 17 वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्पिताला सागर बीजवे या युवकाने उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले तर काही युवकांनी तुषारला पकडून त्याला चांगला चोप देऊन राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.

या घटनेनंतर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके हे राजापेठ पोलीस ठाण्याला पोहचले आणि या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली.

गत तीन वर्षांपासून तुषार मस्करे आणि अर्पिता ठाकरे यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांच्या प्रेमप्रकारणाला अर्पिताच्या घरच्यांचा विरोध होता. अर्पिता अल्पवयीन असल्याने ते दोघे लग्नही करू शकत नव्हते. अर्पिताच्या घरच्यांचा विरोध वाढला असताना तुषारने आज चक्क आपल्या प्रेयसीचीच हत्या केली, अशी माहिती पोलीस उपयुक्त शशिकांत सातव यांनी पत्रकारांना दिली.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून युवतींच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Intro:( युवकाला चोप देतानाचा विडिओ मेकवर पाठवतो)
कवठा बहाळे येथील रहिवासी अर्पिता ठाकरे आणि मलकापूर पांढरी येथे राहणाऱ्या तुषार मस्करे यांच्या प्रेमप्रकरणाला अर्पिताच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने तुषारने अर्पिताची अमरावतीत चुनभट्टी ते मुधोळकर पेठ परिसरात चाकूने गळा चिरून हत्त्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील युवकांनी तुषारला चोप देऊन पोलिसमच्या स्वाधीन केले.

Body: आज दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास मुधोळकरपेठ परिसरात मैत्रिणीसोबत शिकवणीवरून परत येणाऱ्या अर्पितावर तुषारने चाकूने वार केला. मुधोळकरपेठ परिसरातील युवक तुषारला रोखण्यासाठी धावेपर्यंत त्याने अर्पिताच्या अंगावर चाकूने 17 वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्पिताला सागर बीजवे या युवकाने उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले तर काही युवकांनी तुषारला पकडून त्याला चांगला चोप देऊन राजपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेनंतर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके हे राजापेठ पोलीस स्टेशनला पोचले. या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली.
या प्रकरणाबाबत पोलीस उपयुक्त शशिकांत सातव यांनी घटनेबाबत पत्रकारांना माहिती दिली. गत तीन वर्षांपासून तुषार मस्करे आणि अर्पिता ठाकरे यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांच्या प्रेमप्रकारणाला अर्पिताच्या घरच्यांचा विरोध होता. अर्पिता अल्पवयीन असल्याने ते दोघे लग्नही करू शकत नव्हते. अर्पिताच्या घरच्यांचा विरोध वाढला असताना तुषारने आज चक्क आपली प्रेयसीलाच ठार मारले असे पोलीस उपायुक्त सातव म्हणाले.
दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून युवतींच्या सुरक्षितत्याबाबतचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.