अमरावती - अंजनगाव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल (६ सप्टेंबर) उघडकीस आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडिता ही घरी असताना आरोपी तिच्या घरात घुसले व तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी गजानन हरिशचंद्र बारब्दे, नंदू महादेव बारब्दे, विश्वास बारब्दे, धीरज विद्याधर बारब्दे, प्रवीण विश्वास बारब्दे, तुळशीदास जगन्नाथ बारब्दे, संदीप सुखदेव मानकर व विद्यमान महिला सरपंच यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ४४८, ३५४ (अ), ३७६ (ड), २९४, ५०६ तसेच अॅट्रॉसीटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हेही वाचा- आमदार देवेंद्र भुयार यांना कोरोनाची लागण