अमरावती - मागील अनेक महिन्यापासून अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार भागात मोठया प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी शोधमोहिम राबवून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान, पोलिसांनी तब्बल २० लाख रुपये किमतींच्या २९ दुचाकी जप्त करण्यात केल्या असून सात चोरट्यांना अटक केली आहे.
कारवाई दरम्यान 29 दुचाकी जप्त
जिल्ह्यातील अचलपूर उपविभागीय विभागात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीचे सत्र सुरू होते. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. एन. हरी बालाजी यांनी घेतली आणि स्थानिक पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी धाडसत्र राबवून सात आरोपींकडून 29 दुचाकी जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा गाडीचे बनावट कागदपत्र तयार करून लोकांना गाडी विकत असल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे. चांदूरबाजार, शिरजगाव कसबा व ब्राम्हणवाडा पोलिसांनी संयुक्तरित्या ही केली असून एवढया मोठ्या प्रमाणावर पोलीसांनी कारवाई केल्याने दुचाकी चोरट्यांचे धागे दणाणले आहे.
हेही वाचा - शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन