अमरावती - चक्क मुलींच्या वसतीगृहात देशी व विदेशी दारू काढत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या मेळघाटमधील सेमाडोह येथे समोर आला आहे. जय महाकाली या मुलींच्या शासकीय वसतीगृहात हा एका टोळीकडून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. दरम्यान, अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने या वसतीगृहात छापा टाकून १० आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये वसतीगृह अधीक्षकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - वास्तुशांतीच्या कार्यक्रमातून लाखोंचे दागिने लंपास, मुद्देमालासह बागायतदार ताब्यात
अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा परिसरात पेट्रोलिंग करत असतानाच सेमाडोह येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहात बनावट देशी व विदेशी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच आधारे पोलिसांनी छापा टाकून या टोळीला रांगेहाथ पकडून त्यांच्याकडून तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात बनावट दारू, वाहन, मोबाईल आदी वस्तूंसह एकूण १७ लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. आरोपींमध्ये वसतीगृह अधीक्षकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मुलींच्या वसतीगृहात चालणारा हा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईमुळे समोर आला आहे. यानंतर खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १ हजार लिटर अल्कोहोल, एका स्टील कोठीमध्ये पाणी मिश्रित अल्कोहोल, मिनरल वॉटरचे ३६ कॅन, रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या मोटार, बोलेरो गाडी, कार, १२ मोबाईल, ३ हजार रुपये नगदी असा एकूण जवळपास १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १० आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन जण अमरावती येथील आहेत.
हेही वाचा - मोबाईल चोरी करणारी दुकली अटकेत, 5 लाखांहून अधिक माल जप्त