अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील ई क्लास जमिनीवर येथे गेल्या आठ दिवसांपासून पारधी समाजातील ७८ कुटुंबांनी मध्यरात्रीच अतिक्रमण केले. या विरोधात आता गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून आज त्यांनी 'बेसन भाकर करो' हे आंदोलन केले.
गणेशपूर ग्रामस्थांचे आंदोलन या अतिक्रमणामुळे तालुक्यातील विविध गावातील पारधी समाजातील कुटुंब येऊन सुद्धा त्यांनी ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहे. परंतु ही ई क्लास जमीन गावठाण जमीन म्हणून ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला आहे. मध्यरात्रीच अचानक येऊन पारधी समाजातील लोकांनी या जमिनीवर कब्जा केला व सर्वांनी आपापल्या हिश्श्याची जागा सुद्धा आखून घेतली होती. सदर घटना ग्रामस्थांच्या लक्ष देताच ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेली जागा खाली करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु पारधी समाजातील लोकांनी गावकऱ्यांची कुठलीही बाजू न ऐकून घेता त्या जागेवर अतिक्रमण केले. नंतर ग्रामस्थांनी तहसीलदार पोलीस स्टेशन या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी तक्रार सादर केली होती त्या तक्रारीच्या आधारे ग्रामपंचायत सरपंच तहसीलदार व ठाणेदार यांनी घटनास्थळी जाऊन सदर जागा ही शासनाची असून या जागेवर केलेले अतिक्रमण त्वरित खाली करून द्यावे. असे आदेश पारधी समाजातील बांधवांना करण्यात आले होते. परंतु शासनाच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवत त्या ठिकाणी केलेले अतिक्रमण अद्यापही हटविण्यात आले नाही. हे ही वाचा - सरकारने दिलेल्या जमिनीवर रामदेव बाबासह अंबानी कधी उद्योग उभे करणार?
त्यामुळे गणेशपूर ग्रामस्थांनी आता गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर महिलांसह ठिय्या आंदोलन उभारलेले आहे. आज बेसन भाकर आंदोलन करत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. जोपर्यंत पारधी समाजातील लोकांनी ई क्लास जमिनीवर केलेले अतिक्रमण हटवणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील, असे सुद्धा ठाम मत गणेशपूर ग्रामस्थांनी मांडले आहे. ई क्लास जमिनीवर पारधी समाजातील लोकांनी अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण काढण्यास शासनाला कुठला दबाव येत आहे, की राजकीय पोटी शासन कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे का, असा आरोपही गणेशपूर वाशी यांनी केला आहे.