ETV Bharat / state

..अखेर चिखलदाऱ्याच्या भीमकुंडातच करावा लागला पतीचा अंतिम संस्कार

author img

By

Published : May 4, 2019, 11:50 PM IST

चिखलधरा भीमकुंडात २६ वर्षीय गणेश हेकडे या कुस्तीपटून पत्नीसह आत्महत्या केली होती. या घटनेतील मृत गणेशचे मृतदेह बाहेर काढण्यात एसडीआरएफच्या पथकाला अडचणी येत होत्या. दरम्यान, त्यांना अथक प्रयत्नानंतरही गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. त्यामुळे अखेर आज दुपारी कुटुंबाच्या उपस्थितीत दरीवरूनच मृत गणेश हेकडेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

मृत कुस्तीपटू गणेश हेकडे आणि पत्नी राधा हेकडे

अमरावती - चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या गणेश हेकडे या कुस्तीपटूने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह चिखलदरा येथील भीमकुंडात आत्महत्या केली होती. दरम्यान, या घटनेतील मृत गणेश याचे मृतदेह बाहेर काढण्यात एसडीआरएफच्या पथकाला अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, अथक प्रयत्नानंतरही गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. त्यामुळे अखेर आज दुपारी कुटुंबाच्या उपस्थितीत दरीवरूनच मृत गणेश हेकडेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

चिखलदाऱ्याच्या भीमकुंडातच मृत गणेशवर अंतिम संस्कार

गणेश हेकडे हा २६ वर्षीय कुस्तीपटू अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहत होता. दरम्यान, १ मे रोजी त्याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह चिखलदरा येथील २ हजार फूट खोल दरी असलेल्या भीमकुंडात आत्महत्या केली होती. या घटनेच्या ५८ तासानंतर मुंबईवरून आलेल्या एसडीआरएफच्या पथकाला शुक्रवारी रात्री ८ वाजता पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. परंतु पतीचा मृतदेह दरीतच पडून अडकला होता. गणेशच्या मृतदेहाजवळ आग्या मोहाच्या मधमाशाचे मोठे पोळे असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अपयश येत होते. दरम्यान, या पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही.

हे दोन्ही मृतदेह काढण्यासाठी घटनेच्या दिवशी बुधवारपासून पोलीस प्रशासन, चिखलधारामधील रेस्क्यू टीम व स्थानिक नागरिक प्रयत्न करीत होते. परंतु दरी २ हजार फूट खोल होती तसेच तेथे मधमाशांचे मोठे पोळ होते. मृतदेह बाहेर काढताना मधमाशांनी रेस्क्यू टीमवर हल्ला चढवला होता. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, शुक्रवारी सकाळी १२ वाजता नागपूरवरून आलेल्या एसडीआरएफ पथकाने दिवसभराच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी रात्री पत्नी राधा हेकडेचा मृतदेह बाहेर काढला. परंतु रात्री अंधार झाल्याने कार्यात अनेक अडचणी येत होत्या. भीमकुंड ही दरी खोल असल्याने एसडीआरएफच्या पथकाला रात्री रस्ता न दिसल्याने या पथकाची शनिवारची रात्र ही भल्या मोठ्या घनदाट भीमकुंडातच गेली.

आज सकाळपासून घटनास्थळी महसूल, पोलीस, वनविभागासह संबंधीत सर्वच विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. भर उन्हातही प्रयत्न करून प्रशासनाला मृतदेह काढण्यास यश न आल्याने प्रशासनानेही हात टेकले. शेवटी कुटुंबाच्या उपस्थितीत दुपारी मृत गणेशवर दरीवरूनच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Intro:अखेर चिखलदाऱ्याच्या दोन हजार फूट खोल भीमकुंडातच करावा लागला गणेशचा अंतीम संस्कार.

मधमाशामूळे 2000 हजार फूट खोल दरीतून पतीचा मृतदेह काढान्यास प्रशासनाचेही प्रयत्न अपयशी.
-----------------------------------------------

अँकर
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय कुस्तीपटूने आपल्या पत्नीसह 1 मे रोजी कौटुंबिक वादातून चिखलदरा येथील 2000 फूट खोल दरी असलेल्या भीमकुंडात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेच्या 58 तासांनंतर मुबंई वरून एसडीआरएफ च्या पथकाला शुक्रवारी रात्री आठ वाजता पत्नीचा मृतदेह काढण्यात यश आले .पण पतीचा मृतदेह दरीतच पडून अडकला होता.परंतु आज शनिवारी या टीमने अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना गणेश हेडगे चा मृतदेह जवळ आग्या मोहाच्या मधमाशाचे मोठे पोळे असल्याने मृतदेह काढण्यात अपयश आल्याने अखेर आज दुपारी कुटूंबाच्या उपस्तीत दरीवरूनच मृतक पती गणेश हेकडे वर अंतिम संस्कार करण्यात आले.

.हे दोन्ही मृतदेह काढण्यासाठी घटनाच्या दिवशी बुधवार पासून पोलीस प्रशासन,चिखलधारा मधील रेस्क्यू टीम व स्थानीक नागरिक हे प्रयत्न करीत होते. परन्तु दरी 2000 फूट खोल असल्याने व मधमाशाचे मोठे पोळ होते .अशातच या मधमाशांनी रेस्क्यू टीम वर हल्ला चढवला होता त्यामुळे अडचणी समोर होत्या.दरम्यान शुक्रवारी सकाळी 12 वाजता नागपूर वरून आलेल्या एसडीआरएफ टीमने दिवसभराच्या प्रयत्न नंतर काल रात्री पत्नी राधा हेकडे चा मृतदेह बाहेर काढन्यात आला होता. पण रात्री अंधार झाल्याने कार्यात अनेक अडचणी येत होत्या भीमकुंड ही दरी खोल असल्याने एसडीआरएफ च्या पथकाला रात्री रस्ता न दिसल्याने हे पथकाची शनिवार ची रात्र ही भल्या मोठ्या घनदाट भीमकुंडातच गेली.

आज सकाळ पासून घटनास्थळी महसूल,पोलीस, वनविभाग सह संमधीत सर्वच विभागाचे अधिकारी दिवसभर घटना स्थळी उपस्थित होते.भर उन्हातही प्रयत्न करून प्रशासनाला मृतदेह काढण्यास मधमाशाच्या पोळामुळे
यश न आल्याने प्रशासनाचेही हात टेकले शेवटी कुटूंबाच्या उपस्तीत दुपारी मृतक गणेश वर वरूनच अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------------------------
एक वर्षाचा बजरंग झाला पोरका, वडिलांचा चेहराही नाही भेटला पहायला.
मृतक गणेश व राधा ला एक वर्षाला बजरंग हा मुलगा आहे.कौटुंबिक वादारून या दोघांनी आत्महत्या केली.वादानंतर मुलगा हा राधा कडे माहेरी होता, पण आठ दिवस पूर्वी गणेश ने त्याला शहापूर ला आणले होते.अशातच बुधवारी या दोघांनी चिमुकल्या बजरंग चा विचार न करता आत्महत्या करून जिवन तर संपवले परंतु आज बजरंग मात्र कायमचाच पोरका झाला आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.