ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे फळांना उठाव नाही; बाजारपेठांंमध्ये फळांचे ढीग - कोरोना इफेक्ट

लॉक डाऊनचा फटका फळ बाजारालाही बसतो आहे. संत्रा फळाच्या योग्यतेनुसार 100 ते 700 रुपये कॅरेट इतका भाव आहे. सध्या बाजारात सर्वधिक आवक ही टरबूज आणि खरबुजांची आहे. बाजारात सर्वत्र या दोन्ही फळांचे अक्षरशः ढीग लागलेले दिसताहेत. टरबुजचे दर 5 ते 8 रुपये प्रति किलो असे आहेत. तर, खरबूजची मागणी ही 8 ते 16 रुपये इतकी आहे.

लॉक डाऊनमुळे अमरावतीत फळांचा बाजारही डाऊन

author img

By

Published : Apr 9, 2020, 11:39 AM IST

अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना फळांचा बाजारही डाऊन झाला आहे. आमरावतीच्या बाजारात आता आंब्याची आवक वाढायला लागली असून टरबूज आणि खरबूजला मागणीच नाही. फळांची विक्री करण्यासाठी वेळ फार थोडा असल्यामुळे बाजारात मोठया प्रमाणात फळांचा साठा दिसतो आहे.

लॉक डाऊनमुळे अमरावतीत फळांचा बाजारही डाऊन
लॉक डाऊनमुळे अमरावतीत फळांचा बाजारही डाऊन

23 मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले. या लॉक डाऊनचा फटका फळ बाजारालाही बसतो आहे. सद्या संत्र्याचा मोसम संपला असल्याने मोजकीच संत्री बाजारात येत आहे. संत्रा फळाच्या योग्यतेनुसार 100 ते 700 रुपये कॅरेट इतका भाव आहे. सध्या बाजारात सर्वधिक आवक ही टरबूज आणि खरबुजांची आहे. बाजारात सर्वत्र या दोन्ही फळांचे अक्षरशः ढीग लागलेले दिसताहेत. टरबुजचे दर 5 ते 8 रुपये प्रति किलो असे आहेत. तर, खरबूजची मागणी ही 8 ते 16 रुपये इतकी आहे.

अमरावतीमध्ये फळ बाजारातही घसरण
अमरावतीमध्ये फळ बाजारातही घसरण

अमरावतीच्या बाजारात आंबा येण्यास सुरुवात झाली असून हा आंबा आंध्रप्रदेशातून येतो. सद्या 50 ते 70 रुपये किलो असा आंब्याचा दर आहे. तर, कैरी 20 ते 40 रुपये दराने विकली जात आहे. द्राक्षांचे दर 20 ते 40 रुपये किलो आहेत. सद्या अमरावती शहरात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेवर्यंत भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी परवानगी आहे. अवघ्या चार तासात धंदा करायचा असल्याने ठोक बाजारातून आवश्यक तितकाच माल चिल्लर विक्रेते घेत असून बाजारात फळं शिल्लक राहत आहेत.

लॉक डाऊनमुळे अनेक बागायतदार आपला माल बाजारात आणत नाही आहे. बाजारात दररोज 7 ते 8 मिनीट्रक माल विक्री करणारे दलाल आता केवळ एक मिनीट्रक फळांची विक्री करत आहेत. कोरोनाचे संकट नसते तर 5 ते 8 रुपये किलोच्या टरबुजचे दर 15 ते 20 रुपये किलोपर्यंत असते. तर, इतर सर्व फळांच्या दारात 12 ते 15 रुपयांचा फरक असता, असे व्यपाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूण फळ बाजाराची परिस्थिती डबघाईस आलेली असून याचा फटका फळं उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.