अमरावती - रेमडीसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून डॉ. पवन मालुसुरे व अन्य एक पसार आहेत. उर्वरित एक आरोपी करोनाग्रस्त असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
चौघांना पोलीस कोठडी -
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात आरोपी डॉ. अक्षय मधुकर राठोड (24), अनिल विनीत फुटाणे, शुभम शंकर किल्लेकर (24) व शुभम कुमोद सोनटक्के (24) या चार जणांना पोलीस कोठडी न्यायदंडाधिकार्यांनी नाकारली होती. त्यामुळे सरकारी पक्षातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने चारही आरोपींना 27 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, डॉ. पवन मालुसुरे व आरोपी परिचारीका सध्या पसार आहेत. मालुसुरे यांची जमानत यापूर्वीच खारीज करण्यात आली होती. याशिवाय अनिल गजानन पिंजरकर (38) याला कोरोनाची लागण असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
आरोपींना ताब्यात घेतले -
रेमडेसिवीर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून डॉ. पवन मालुसुरे व परिचारिका युवती सध्या फरार आहेत. दोघेही न्यायालयापुढे हजर झाल्यानंतर त्याच्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन