ETV Bharat / state

Farmer Success Story : एक एकर संत्रा पणेरी शेतीतून वर्षाला चार लाखांचा नफा; उच्चशिक्षित तरुण कमाल

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील उच्चशिक्षित तरुण विक्रम गणोरकर हा युवा शेतकतरी नोकरीच्या मागे न लागता हा तरुण शेतकरी केवळ एक एकर संत्रा पणेरी (कलमा) च्या शेतीतून वर्षाकाठी १० ते १२ लाखांचे उत्पादन घेतो. ( Farmer Success Story Amravati )

author img

By

Published : Jan 8, 2022, 4:52 PM IST

Updated : Jan 8, 2022, 5:33 PM IST

Farmer Success Story
शेतकरी यशकथा

अमरावती - नैसर्गिक संकटाच्या मालिकेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. बिनभरवशाच्या या शेतीमुळे अनेक तरूण शेती सोडून 15-20 हजारांची नोकरी करण्यासाठी पुणे-मुंबई सारखे शहर गाठतात. तर अनेक तरूण शेतीमुळे हताश होऊन आत्महत्यासारखे पाऊल उचलतात. मात्र, असे असले तरी शेतीच्या उत्तम नियोजनातून कमी शेतीतही लाखो रुपये कमावणारे तरुण शेतकरी आजही आहे. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील उच्चशिक्षित तरुण विक्रम गणोरकर हा युवा शेतकतरी नोकरीच्या मागे न लागता हा तरुण शेतकरी केवळ एक एकर संत्रा पणेरी कलमाच्या शेतीतून वर्षाकाठी १० ते १२ लाखांचे उत्पादन घेतो. ( Paneri Orange Farm in Amravati ) शेतीसाठी लागणारा खर्च काढून वर्षाकाठी जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचा नफा तो मिळवतो. ( Farmer Success Story Amravati )

याबाबत तरूण शेतकरी माहिती देताना

वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील विक्रम गणोरकर यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. यात पाच एकर शेतीत संत्राची झाडे तर एका एकरमध्ये ते संत्राच्या पणेरीची शेती करतात. वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादक शेतकरी आहे. या भागातील संत्राला देशभर मागणी देखील राहते. त्यामुळे याच भागात संत्राच्या कलमादेखील तयार केल्या जातात. विक्रम गणोरकर यांचे वडील मोहन गणोरकर यांचा हा फार पूर्वीपासून पणेरी विक्रीचा व्यवसाय आहे. आता त्यांचा उच्चशिक्षित मुलगा विक्रम हादेखील संत्रा पणेरी तसेच लिंबू आणि मोसंबीच्या पणेरीची शेती करत आहे. विक्रम हा उच्चशिक्षित असल्याने त्या शिक्षणाचा फायदा या शेतीसाठी तो करतो. त्या माध्यमातून नवनवीन नवीन प्रयोग हे संत्रा पणेरी शेतीतुन करत असल्यामुळे त्यांना लाखोंचा नफा मिळतो.

इतर राज्यात विक्रम यांच्या संत्रा पणेरीला मागणी -

विक्रम यांनी पणेरी शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. शेताला योग्य शेणखत, फवारणी यामुळे कलमांची वाढ ही निरोगी होते. तसेच पणेरी चांगल्या दर्जाची असल्याने राजस्थान, मध्यप्रदेश, तसेच महाराष्ट्रमधील औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, बुलढाणा, अकोला आदी जिल्ह्यातील शेतकरी संत्रा झाडाच्या लागवडीसाठी विक्रम गणोरकर यांच्या नर्सरीमधील कलम या लागवडीसाठी नेत असतात.

हेही वाचा - ST Worker Strike : एसटीतील 'या' एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटनेची मान्यता रद्द; औद्योगिक न्यायालयाचा दणका

एनआरसीसी नागपूरमधून आणले होते सुरुवातीला कलम -

गणोरकर यांनी सुरुवातीला नागपूरमधील एनआरसीसीमधून संत्राच्या कलमा आणल्या होत्या. पणेरीसाठी सुरुवातीला ईडलिंबूचे रोप हे नोव्हेंबर महिन्यात टाकले जाते. त्यांनतर पावसाळ्यात ते काढून दुसऱ्या ठिकाणी लावले जाते. त्यांनतर संत्राच्या झाडावरील डोळे काढून त्या ईडलिंबूच्या कलमाला सात इंचनंतर बँडींग केले जाते. नंतर संत्राची कलम तयार होते.

सध्या शेतात ५० हजार संत्रा पणेरीच्या कलमा -

विक्रम गणोरकर यांच्या एक एकर शेतावर सध्या 50 हजार संत्राच्या कलमांची लागवड झाली आहे. यासाठी सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पादन होईल, असा विश्वास विक्रम गणोरकर यांना आहे. त्यातून त्यांना चार ते पाच लाख रुपये नफा मिळेल असे वाटते.

वडिलांचे मिळते नेहमी मार्गदर्शन -

वडील मोहन गणोरकर यांच्या वडिलांचा हा व्यवसाय होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. विक्रम यांना या शेतीसाठी वडिलांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. त्या मार्गदर्शनातून उत्तम शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर तरुणांनीही कमी पैशाच्या नोकरीच्या मागे न लागता आपली शेती करावी त्यातून चांगला नफा मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 8, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.