अमरावती : मेळघाटातील कोलकास पर्यटन केंद्रात ( Colcas Tourist Center ) असलेल्या लक्ष्मी, सुंदरमाला, चंपाकली व जयश्री या हत्तीनी पर्यटकांना जंगल सफारी ( Elephant Safari For Tourists ) घडवतात. माणूस काम करून थकला की, त्याला अराम हवा असतो. तसंच या मुक्या प्राण्यांच देखील. वर्षभर पर्यटकांना आपल्या पाठीवर बसवून जंगल सफारी घडवणाऱ्या या हत्तिणींच्या पायावर वर्षातून एकदा आयुर्वेदिक उपचार केले जातात. ज्याला चोपिंग असे म्हणतात. यंदाही या उपचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता 15 दिवस लक्ष्मी, सुंदरमाला, चंपाकली आणि जयश्री या मस्त आराम करणार ( Melghat Elephant On Vacation ) आहेत.
पायाला भेगा पडू नये म्हणून
कोलकास येथे लक्ष्मी, सुंदरमाला, चंपाकली व जयश्री या हत्तिणींना काही वर्षापूर्वी जंगलाची सुरक्षा व वनविभागाच्या दिमतीला गस्त व लाकडांची उचल करण्यासाठी वापरले जात होते. मात्र, मागील वर्षीपासून पर्यटकांसाठी त्यांची हत्ती सफारी सुरू करण्यात आली आहे. पाठीवरील हौदात बसून मोठ्या हौसेने आरूढ होत मेळघाटच्या निसर्गाचा आनंद घेतात. त्यांच्या भागांना पायांना भेगा पडू नये म्हणून, वर्षभरातून एकदा त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार जातात त्यालाच चोपिंग असे म्हणतात.
आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर
या पद्धतीसाठी अनेक आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर केला जातो. पायावर चोपिंग प्रक्रिया करण्यासाठी हिरडा, बिब्बा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, फली तेल, डिकमाळी, ओवा, फुल, अस्मंतरा, नीळ, साबण, विलायची, गेरू, कात, किंग, जायफळ, सागरगोटी, मंजू फळ इत्यादी विविध आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो. या संपूर्ण वनस्पतीचा लेप करून तो हत्तीच्या पायाला लावला जातो.
सकाळीच केली जाते ही प्रक्रिया
पहाटे सकाळी सूर्यकिरण कोवळी असतात. एका पिंपात आगीवर तयार करण्यात आलेला आयुर्वेदिक लेप हत्तीच्या पायाला लावण्यात येतो. तब्बल पंधरा दिवस हा उपचार केला जाणार आहे. या उपचाराचा हत्तींना फायदा होतो. पंधरा दिवसानंतर या हत्तिणी पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.