अमरावती - नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नामांकित कंपन्यांच्या नाममुद्रेखाली तयार केलेली भेसळयुक्त अवैध दारू माफक दरात विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच निरीक्षक पथके तयार केली आहेत. ही पथके अवैध दारू विक्री व बनावट दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांनी दिली.
हेही वाचा - डहाणू तालुक्यात अवैध विदेशी दारूसाठा जप्त; एकास अटक
भेसळयुक्त दारू शरिरासाठी हानीकारक असल्याने त्यापासून सावध राहण्याचे तसेच, अवैध विक्री होत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीची तक्रार नोंदवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टोल फ्री क्रमांक तसेच व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे.