ETV Bharat / state

Building collapse in Amravati : अनेक दिवसांपासून छतावर पडून होता इमारतीचा मलबा, आज झाला घात - पाच जण दगावले

अमरावती शहरातील प्रभात चौकात आज इमारत कोसळल्याने ( building collapsed in Amravati ) इमारतीच्या ढिगार्‍याखाली दबून पाच जण ( Five people died ) दगावले. दोन मजली असणाऱ्या इमारतीमधील वरच्या मजल्यावर असणाऱ्या राजेंद्र लॉजला अमरावती महापालिकेने ( Amravati Municipal corporation ) शिकस्त झाल्यामुळे पाडण्याची नोटीस बजावली होती. लॉज मालक अॅड. जैन यांनी दुसऱ्या मजल्यावर असणारा लॉजची संपूर्ण इमारत तोडली. मात्र त्याचा संपूर्ण ढिगारा छतावरच ठेवला. वर्षभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हा ढिगारा ओला झाला होता. याच्या भाराने छत कोसळू नये यासाठी तळमजल्यावर असणाऱ्या राजदीप एम्पोरियम या बॅगच्या दुकान मालकाने लोखंडी पाईप लावून छताला आधार दिला होता. वरचे छत कोसळू नये म्हणून आजच्या दिवशी काम सुरू असतानाच, हे छत कोसळले.

Building collapse in Amravati
अमरावतीत इमारत कोसळल्याने इमारतीच्या ढिगार्‍याखाली दबून पाच लोकांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 30, 2022, 8:33 PM IST

अमरावती : शहरात अत्यंत दुर्दवी घटना घडली आहे. शहरातील प्रभात चौकात आज इमारत कोसळल्याने ( building collapsed in Amravati ) इमारतीच्या ढिगार्‍याखाली दबून पाच जण ( Five people died ) दगावले. दोन मजली असणाऱ्या इमारतीमधील वरच्या मजल्यावर असणाऱ्या राजेंद्र लॉजला अमरावती महापालिकेने ( Amravati Municipal corporation ) शिकस्त झाल्यामुळे पाडण्याची नोटीस बजावली होती. लॉज मालक अॅड. जैन यांनी दुसऱ्या मजल्यावर असणारा लॉजची संपूर्ण इमारत तोडली. मात्र त्याचा संपूर्ण ढिगारा छतावरच ठेवला. वर्षभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हा ढिगारा ओला झाला होता. याच्या भाराने छत कोसळू नये यासाठी तळमजल्यावर असणाऱ्या राजदीप एम्पोरियम या बॅगच्या दुकान मालकाने लोखंडी पाईप लावून छताला आधार दिला होता. वरचे छत कोसळू नये म्हणून आजच्या दिवशी काम सुरू असतानाच, हे छत कोसळले.

दुकान व्यवस्थापक अमरावतीत येताच घडली घटना - प्रभात चौकात जवाहर गेटच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर राजदीप एम्पोरियम हे पहिलेच बॅगचे दुकान होते. या दुकानाचे मालक दिनेश शहा हे मुंबईला राहतात. अमरावतीला त्यांचा हा व्यवसाय राजू परमार हे सांभाळत होते. दिवाळी होताच या दुकानात पाईप लावून वरचे छत मजबूत करण्याचे काम सुरू झाले होते. हे काम सुरू होताच दुकानाचे व्यवस्थापक राजू परमार हे मुंबईला गेले होते. ते शनिवारीच मुंबईवरून अकोल्याला त्यांच्या बहिणीकडे भाऊबीज निमित्त गेले होते. आज ते अमरावतीत आले असताना एका मंदिरात त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अन्नकुटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अवघ्या पाच मिनिटांमुळे कायमचे दुरावले - राजू परमार अन्नकुत्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी हे दुकानाचे काम सुरू असल्यामुळे ते पाहण्यासाठी दुकानात पोहोचले. यावेळी दुकानांमध्ये मोहम्मद आरिफ, शेख रहीम रिजवान शहा रफिक शेख ,मोहम्मद कमर आणि देवा हे चार जण काम करीत होते. दुकानात सुरू असलेले काम पाहून राजू परमार अवघ्या पाच मिनिटातच परत जाण्यासाठी निघाले असताना, चहा येतो आहे असे सांगून दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना थांबवले. चहा पिऊन जाऊ म्हणून राजू परमार दुकानासाठी थांबले आणि याचवेळी अचानक दुकानाचे छत कोसळले आणि राजू परमार यांच्यासह दुकानात काम करणारे चारही जण ढिगाराखाली दबून मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे दुर्लक्ष - या दुर्दैवी घटनेमुळे अमरावती शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळेच शहरातील शिकस्त इमारतींवर कुठलीही कारवाई केली जात नसल्याची ओरड आता व्हायला लागली आहे. याआधी 14 जुलैला देखील अमरावती शहरातील गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर 45 वर्षे जुनी दोन मजली इमारत कोसळली होती. अवघ्या तीन महिन्यातच शहरात ही दुसरी गंभीर घटना घडली असून अशा शिखस्त इमारतींबाबत महापालिका प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे बोलले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.