अमरावती - विदर्भाचे काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्काय वॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदरा येथे दोन टेकड्यांना जोडणारा भारतातील पहिला स्काय वॉक तयार होतोय. गोरा घाट पॉईंट पासून तर हरिकेन पॉईंट पर्यंत पाचशे मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. जवळपास 35 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षात स्कायवॉक पर्यटनासाठी तयार असणार आहे.
चिखलदऱ्यातील पर्यटकांसाठी लवकरच सुरू होणार देशातला पहिला स्काय वॉक - गोरा घाट ते हरिकेन पॉईंट स्काय वॉक बातमी
हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्काय वॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारा विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल.
चिखलदऱ्यातील पर्यटकांसाठी लवकरच सुरू होणार देशातला पहिला स्काय वॉक