ETV Bharat / state

अमरावतीमधील नेमाणी कॉटन जीनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

शहरातील नेमाणी कॉटन जीनला आग आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत हजारो क्विंटल कापूस जळाला असून या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

author img

By

Published : Jan 21, 2021, 9:41 PM IST

fire-at-nemani-cotton-jean-in-amravati
अमरावतीमधील नेमाणी कॉटन जीनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

अमरावती - शहरातील विलास नगर परिसरात स्थित नेमाणी जीनला आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत 1297 क्विंटल कापसाची गंजी जळाली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात -

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जीनच्या मैदानात ठेवलेल्या 1297 क्विंटल कापसाच्या आगीच्या गंजीने मोठा पेट घेतला होता. अग्निशामक दलाचे प्रमुख मो. सय्यद यांच्या नेतृत्वात ही आग नियंत्रणात आणण्यात आली.

नुकसानीचा अंदाज नाही -

या आगीसंदर्भात 'ईटीव्ही भारत' शी बोलताना नेमाणी जिनिंगचे संचालक अनुप राठी यांनी ही आग नेमकी कशी लागली, हे अस्पष्ट असल्याचे सांगितले. तसेच याठिकाणी 1297 क्विंटल कापसाची गंजी लावली होती. अशा अनेक गंजी याठिकाणी लागल्या असल्या तरी या गंजीला नेमकी आग कशी लागली हे माहिती नाही. आगीत नेमका किती कापूस जाळलास, हे स्पष्ट झाले नसून नुकसान किती झाले याचा अंदाज लागला नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - 'पलटीमार आणि खोटारड्या विनायक मेटेंनी महाराष्ट्राची माफी मागावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.