ETV Bharat / state

टायपिंग शिकताना जुळले प्रेम; शारीरिक शोषण केल्यावर लग्नास नकार - गुन्हा दाखल

योगेश डोलारे याचा क्रशरचा व्यवसाय आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात त्याची ओळख टायपिंग सेंटरमध्ये टायपिंग शिकण्यासाठी येणाऱ्या एका तरुणीसोबत झाली होती. यानंतर दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले.

फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला
author img

By

Published : May 2, 2019, 9:29 PM IST

अमरावती - टायपिंग शिकायला येणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसुत जुळवून लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकाविरोधात फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडाळी परिसरातील योगेश देवराव डोलारे (वय २९) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

टायपिंग शिकताना जुळले प्रेम; शारीरिक शोषण केल्यावर लग्नास नकार

योगेश डोलारे याचा क्रशरचा व्यवसाय आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात त्याची ओळख टायपिंग सेंटरमध्ये टायपिंग शिकण्यासाठी येणाऱ्या एका तरुणीसोबत झाली होती. यानंतर दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. योगेश डोलारे याने त्या तरुणीला लग्नाचे आमिष देऊन त्याच्या मित्राच्या घरी त्या तरुणीचे शारीरिक शोषण केले. २२ नोव्हेंबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तरुणीवर सलग शारीरिक शोषण करण्यात आले. यानंतर योगेश डोलारेने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. योगेशने प्रेमाच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याने पीडित तरुणीने आज (गुरुवार) फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठले. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश डोलारेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Intro:टायपिंग शिकायला येणाऱ्या युवतीसोबत प्रेमसुत जुळवून ल ग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकाविरोधात फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वडाळी परिसरातील योगेश देवराव डोलारे (२९) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

Body:योगेश डोलारे याचा क्रॅशरचा व्यवसाय आहे. गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याची ओळख तायपिंग सेंटरमध्ये टायपिंग शिकण्यासाठी येणाऱ्या एका युवतीसोबत झाली होती. यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. योगेश डोलारे याने युवतीला लग्नाचे आमिष देऊन यशोदा नगर परिसरात त्याच्या मित्राच्या घरी तसेच वडाळी परिसरात एका घरात युवतीचे शारीरिक शोषण केले. २२ नोव्हेंबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत युवतीचे सलग शारीरिक शोषण करण्यात आले. यानंतर योगेश डोलारेने युवतीस लग्न करण्यास नकार दिला. योगेशने प्रेमच्या नावाखाली सर्वस्व लुटण्याने पीडित युवतीने आज फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठले. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश डोलारे विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.