ETV Bharat / state

स्टंटबाजी करणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करावा, शिवसेनेची मागणी - Navneet Rana Amravati

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांनी राणा दाम्पत्य नेहमीसारखी नौटंकी करायला लागले असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. खासदार म्हणून नवनीत राणा यांनी एकही महत्वाचे काम जिल्ह्यात केले नाही. त्यांच्याबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असे शिवसेने तर्फे सांगण्यात आले.

राणा दाम्पत्य
राणा दाम्पत्य
author img

By

Published : Oct 12, 2020, 6:31 PM IST

अमरावती- मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करीत धावत्या बसमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. परतवाडा ते धारणी हा प्रवास राज्य परिवहन महामंडळच्या बसने केल्याचा दावा करणाऱ्या राणा दाम्पत्याने हरिसल ते चित्री या १० कि.मी अंतरदरम्यानचाच प्रवास केला. हा सारा प्रकार नेहमीप्रमाणे नौटंकी आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर

अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी दोन दिवसापूर्वी मेळघाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला होता. या प्रवासाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून मेळघाटात धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या खराब गाड्या मेळघाटात पाठवल्या जात असल्याचा आरोप राज्य शासनावर केला होता. यावर, मुख्यमंत्र्यांनी घरात बसून राहू नये, तर घराबाहेर पडून लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या, अशी टीका राणा दामपत्याने केली होती.

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांनी राणा दाम्पत्य नेहमीसारखी नौटंकी करायला लागले असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. खासदार म्हणून नवनीत राणा यांनी एकही महत्वाचे काम जिल्ह्यात केले नाही. त्यांच्याबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. असे असताना मेळघाटात धावत्या बसमध्ये राणा दाम्पत्याने केलेली स्टंटबाजी हा गुन्हा आहे. धावत्या बसमधून हात बाहेर काढणे, डोके बाहेर काढण्यास मनाई असताना राणा दाम्पत्य धावत्या गाडीचे दार उघडे ठेवून मुख्यमंत्र्यांविरोधात स्टंटबाजी करतात. त्यांच्यावर खरे तर गुन्हा दाखल व्हायला हवा, असे प्रवीण हरमकर म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदीप बाजाड, राहुल माटोडे, शाम देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा- 'उमेद' वाचवण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.