अमरावती - राज्यात पशु हिंसा कायदा अंतर्गत रेड्यांची झुंझ लावायला बंदी असतानादेखील कायद्याला न जुमानता अमरावती जिल्ह्यातील परसोड गावात काही पशु मालकांनी रेड्यांची झुझं भरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही झुझं भरवणाऱ्या आयोजकांवर पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, रेड्यांच्या झुंझेची ही जीवघेणी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनाही मोठ्या गर्दी केली होती.
आजही भरवल्या जाते रेड्यांची झुझं -
पूर्वी ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करत होते. परंतु या झुंझीमध्ये या जनावरांची हिंसा होत असल्याने न्यायालयाने या रेड्यांच्या झुंझीवर बंदी घातली आहे. असे असले तरी अनेक हौशी आजही रेड्यांची झुझं भरवत असतात. अशातच अमरावती जिल्ह्यातील परसोड गावातदेखील रेड्यांची झुंझ भरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, यापूर्वी रेड्यांची झुंझ भवरवणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हेदेखील दाखल केले आहेत.
हेही वाचा - काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच