अमरावती - कौटुंबिक वादातून जावयानेच सासऱ्याची काठीने मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री खोलापूरात ही घटना घडली. या प्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नामदेव नारायण चांदूरकर (७५) असे मृताचे नाव आहे. तर राजू डिगांबर उमक (५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू हा भंगार साहित्य गोळा करण्याचे काम करत होता. दोन महिन्यांपासून पत्नीसह तो सासऱ्याकडे राहत होता. अनेकदा त्याचे सासऱ्यासोबत वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री जावई आणि सासरे यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि राजूने सासऱ्यावर काठीने हल्ला चढविला. या मारहाणीत नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर राजू घरातून निघून गेला.
घटनेची माहिती मिळाताच खोलापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी घटनेचा पंचनामा केला आणि आरोपीस अटक केली आहे.