ETV Bharat / state

वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, फास्टॅग नसलेल्या वाहनांना भरावा लागणार दुप्पट टोल - अमरावती लेटेस्ट न्यूज

आजपासून वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे वाहनांना फास्टॅग लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य
वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य
author img

By

Published : Feb 16, 2021, 5:00 PM IST

अमरावती - महामार्गावरील टोल नाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा त्यातून प्रवासासाठी लागणारा वेळ त्यामुळे होणारा मनस्ताप हे सर्व कमी करण्यासाठी व टोल नाक्यावर न थांबता प्रवास सुखर होण्यासाठी देशभरातील टोल नाक्यांवर फास्टॅग प्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु अद्यापही अनेक वाहनचालकांनी आपल्या वाहनावर फास्टॅग लावलेला नाही. मात्र आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आला असून, फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

टोल नाक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्राकडून फास्टॅग प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. वाहनचालकांना फास्टॅग लावण्याचे आवाहन अनेकवेळा प्रशासनाकडून करण्यात आले होते. फास्टॅग लावण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत संपली असून, आजपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे.

वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य

केवळ 40 ते 45 टक्के वाहनांवरच फास्टॅग

अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या नांदगाव पेठ टोल नाक्यांवर दररोज दहा हजारांपेक्षा अधिक वाहनांची ये- जा असते मात्र त्यातील केवळ 40 ते 45 टक्के वाहनांवरच फास्टॅग लावण्यात आल्याची माहिती टोलनाका प्रशासनाने दिली आहे.

फास्टॅग लावला नसल्यास दुप्पट टोल

आजपासून टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या वाहनांनी अद्यापर्यंत फास्टॅग लावला नसेल त्या वाहनांना दुप्पट टोला भरावा लागणार आहे. वाहनचालकांना फास्टॅग लावणे सोईचे व्हावे यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर फास्टॅगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.