ETV Bharat / state

'...आत्महत्या करण्याची वेळ आलीय आमच्यावर' - agriculture news in marathi

शेतकऱ्याने पिकवलेला सोयाबीन ३ हजार रुपये क्विंटलने विकला जातो. पण त्याच शेतकऱ्याला बियाण्याच्या रुपाने हे सोयाबीन ८ हजार रुपये क्विंटलने खरेदी करावे लागते. हे सर्व पाहून एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आली, असल्याची प्रतिक्रिया दिली.

Farmers reaction on Soybean seed rate hike
'स्थिती इतकी वाईट की आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आमच्यावर'
author img

By

Published : May 31, 2020, 11:17 AM IST

अमरावती - देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातला असून सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अचानक आलेल्या या संकटाची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. परिणामी शेतकऱ्यांचे नगदी पीक कापूस, तूर व हरभरा बाजारात गेलाच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आधीच हतबल झालेल्या अन्नदात्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे बियाण्याच्या दरवाढीचे.

१ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू केली आहे. कोरोनाची भीती असतानाही शेतकरी योग्य खबरदारी घेऊन खते, बी-बियाणे, शेती अवजारे व आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बी-बियाण्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या बॅगची पिशवी २४०० रुपयाला विकली जात आहेत. मागील वर्षी हीच पिशवी १८०० रुपयाला होती.

शेतकरी आपली व्यथा मांडताना...

गंभीर बाब म्हणजे, शेतकऱ्याने पिकवलेला सोयाबीन ३ हजार रुपये क्विंटलने विकला जातो. पण त्याच शेतकऱ्याला बियाण्याच्या रुपाने हा सोयाबीन ८ हजार रुपये क्विंटलने खरेदी करावे लागतो. हे सर्व पाहून एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आली, असल्याची प्रतिक्रिया दिली.

काय आहे शेतकऱ्यांची व्यथा -

  • घरात १५ क्विंटन कापूस खरेदी अभावी पडू आहे. त्यात खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. या खरीपाच्या पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न आमच्या समोर आहे - सुनिल बारवाल, शेतकरी
  • तीन एकरात काबाडकष्ठ करून ३५ क्विंटर कापूस पिकवला. भाव वाढेल या आशेने तो घरी ठेवला. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि हा कापूस नाईलाजास्तव ४ हजार ५०० क्विंटलने खासगी व्यापाऱ्याला विकावे लागले. बँक लोन देत नाही. दुकानदार बियाणं उधार देत नाही. यामुळे तब्बल ४५ हजाराचे तोटा सहन करुन कापूस विकावा लागला - सचिन बारबाल

दरम्यान, बियाण्याच्या वाढत्या किंमतीवर आळा घालून त्याचा काळाबाजार थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा - ..केवळ ३५ हजार शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी; खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

हेही वाचा - मटन विक्रेत्याला कोरोना झाल्यामुळे शेगाव नाका परिसरात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.