अमरावती - मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गुणवंत किसन गजबे असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतातील विहिरीतच उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा - अमरावती: मद्यधुंद अवस्थेत उपकोषागार अधिकाऱ्याचे आपल्याच कार्यालयात लोटांगण..
गुणवंत गजबे हे चिंचोली गवळी येथील रहिवासी असून धारूड शेत शिवारामध्ये त्यांची स्वतःची तीन एकर जमीन आहे . दुष्काळामध्ये संत्र्याची बाग वाळली आणि अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने गुणवंत हे बरेच दिवसापासून विवंचनेत होते. त्यांच्यावर असलेले बँकेचे कर्ज व गावातील खासगी देणे कसे द्यावे या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा - अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन